Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:43

[1] जो परात्पराच्या आश्रयात राहतो, तो सर्वसामर्थ्याच्या सावलीत राहील.

[2] मी परमेश्वराविषयी म्हणेन की, “तो माझा आश्रय आणि माझा किल्ला आहे, माझा देव, ज्यावर मी विश्वास ठेवतो.”

[3] कारण तो तुला पारध्याच्या पाशातून आणि नाश करणाऱ्या मरीपासून तुला सोडवील.

[4] तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.

[5] रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,

[6] किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.

[7] तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.

[8] तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.

[9] कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.

[10] तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.

[11] कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.

[12] ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.

[13] तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.

[14] तो माझ्याशी निष्ठावान आहे, म्हणून मी त्यास सोडवीन; मी त्यास सुरक्षित ठेवीन कारण तो माझ्याशी प्रामाणिक आहे.

[15] जेव्हा तो माझा धावा करील तेव्हा मी त्यास उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याबरोबर राहीन; मी त्यास विजय देईन आणि त्याचा सन्मान करीन.

[16] मी त्यास दीर्घायुष्य देईन, आणि त्यास माझे तारण दाखवीन.

स्तोत्रसंहिता — Chapters