Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:50

[1] माझ्या संकटात मी परमेश्वराकडे मोठ्याने ओरडलो, आणि त्याने मला उत्तर दिले.

[2] हे परमेश्वरा, जे कोणी आपल्या ओठाने खोटे बोलतात, आणि आपल्या जिभेने फसवतात त्यापासून माझा जीव सोडीव.

[3] हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल, आणि आणखी तुला काय मिळणार?

[4] तो योद्ध्याच्या धारदार बाणांनी, रतम लाकडाच्या जळत्या निखाऱ्यावर बाणाचे टोक तापवून तुला मारील.

[5] मला हायहाय! कारण मी तात्पुरता मेशेखात राहतो, मी पूर्वी केदारच्या तंबूमध्ये राहत होतो.

[6] शांतीचा तिरस्कार करणाऱ्यांबरोबर मी खूप काळ राहिलो आहे.

[7] मी शांतीप्रिय मनुष्य आहे, पण जेव्हा मी बोलतो, ते युध्दासाठी उठतात.

स्तोत्रसंहिता — Chapters