Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:51

[1] हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र तंबूत कोण राहू शकेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील?

[2] जो निर्दोषपणे चालतो आणि जे चांगले ते करतो, आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो तो.

[3] जो आपल्या जीभेने चुगली करत नाही, किंवा दुसऱ्यांची हानी करत नाही, किंवा आपल्या शेजाऱ्याचा अपमान करत नाही.

[4] अधमाचा तिरस्कार करतो, परंतु जे परमेश्वराचे भय धरतात त्यांचा सन्मान करतो, जो वचन देऊन आपले अहीत झाले तरी मागे हटत नाही,

[5] जेव्हा तो पैसे उधार देतो तेव्हा व्याज घेत नाही, जो निर्दोष लोकांविरूद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही. तो, जो या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

स्तोत्रसंहिता — Chapters