Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:05

[1] परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वरास नवे गीत गा; विश्वासणाऱ्याच्या मंडळीत त्याचे गीत गा.

[2] इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.

[3] ते त्याच्या नावाची स्तुती नाचून करोत; ते त्याच्या स्तुतीचे गीत डफाने आणि वीणेने करो.

[4] कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.

[5] भक्त विजयाने हर्षभरित होवोत; ते आपल्या अंथरुणावरुन विजयासाठी गाणे गावो.

[6] देवाची स्तुती त्यांच्या मुखात असो, आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात असो.

[7] यासाठी की त्यांनी राष्ट्रावर सूड उगवावा आणि लोकांस शिक्षा करावी.

[8] ते त्यांच्या राजांना साखळंदडाने आणि त्यांच्या सरदारांना लोखंडी बेड्यांनी बांधतील.

[9] ते लिहून ठेवलेला जो न्याय आहे तो अंमलात आणतील. हा त्याच्या सर्व विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आदर आहे. परमेश्वराची स्तुती करा.

स्तोत्रसंहिता — Chapters