Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:52

[1] परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.

[2] तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.

[3] तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.

[4] मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.

[5] तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.

[6] खचित माझ्या आयुष्याचे सर्व दिवस हित आणि प्रेमदया माझ्या मागे चालतील, आणि परमेश्वराच्या घरात मी अनंतकाळ राहीन.

स्तोत्रसंहिता — Chapters