Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:43

[1] हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;

[2] मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.

[3] तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.

[4] हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.

[5] तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.

[6] हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.

[7] मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?

[8] मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस.

[9] जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.

[10] तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.

[11] जरी मी म्हणालो, खचित अंधार मला लपविल, आणि तरीही रात्र माझ्याभोवती प्रकाशच होईल.

[12] काळोख देखील तुझ्यापासून काहीच लपवित नाही. रात्रही दिवसासारखीच प्रकाशते, कारण तुला काळोख आणि प्रकाश दोन्ही सारखेच आहेत.

[13] तू माझे अंतर्याम निर्माण केलेस; तूच माझ्या आईच्या गर्भात मला घडवले.

[14] मी तुला धन्यवाद देतो, कारण तुझी कृत्ये भयचकीत आणि आश्चर्यकारक आहेत, हे तर माझा जीव पूर्णपणे जाणतो.

[15] मी गुप्तस्थळी निर्माण होत असता, आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.

[16] तू मला गर्भात पिंडरूपाने असताना पाहिलेस; माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या पुस्तकात नमूद करून ठेवले होते.

[17] हे देवा, तुझे विचार मला किती मोलवान आहेत, त्यांची संख्या किती मोठी आहे.

[18] मी जर ती मोजू लागलो तर ती वाळूच्या कणांपेक्षाही जास्त ठरतील. जेव्हा मी जागा होतो, तेव्हाही मी तुझ्याजवळच असतो.

[19] हे देवा! जर तू दुष्टांना मारुन टाकशील; अहो हिंसाचारी मनुष्यांनो! माझ्यापासून दूर व्हा.

[20] ते तुझ्याविरूद्ध बंड आणि कपटाने कृती करतात; तुझे वैरी तुझे नाव व्यर्थ घेतात.

[21] परमेश्वरा! तुझा द्वेष करणाऱ्यांचा मी का द्वेष करू नये? तुझ्याविरुध्द उठणाऱ्यांचा मी का तिरस्कार करू नये?

[22] मी त्यांच्या पराकाष्ठेचा पूर्ण द्वेष करतो; ते माझे शत्रू झाले आहेत.

[23] हे देवा, माझे परीक्षण कर आणि माझे मन जाण; माझी परीक्षा घे आणि माझे विचार जाणून घे.

[24] माझ्या मनात जर काही दुष्ट मार्ग असतील तर पाहा, आणि मला सनातन मार्गाने चालीव.

स्तोत्रसंहिता — Chapters