Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:15

[1] हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.

[2] तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून, बाळांच्या आणि तान्ह्या मुलांच्या मुखात तू उपकारस्तुती उत्पन्न केली.

[3] तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या आकाशाकडे, चंद्र आणि ताऱ्यांकडे मी जेव्हा बघतो.

[4] तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी? किंवा मनुष्यसंतान काय आहे की तू त्यांच्याकडे आपले लक्ष लावावे?

[5] तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा थोडेसेच कमी केले आहेस. आणि गौरवाने व आदराने तू त्यास मुकुट घातला आहे.

[6] तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस. तू सर्वकाही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस.

[7] सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.

[8] आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे जे काही सागराच्या मार्गातून फिरते ते सर्व.

[9] हे परमेश्वरा, आमच्या देवा, सर्व पृथ्वीत तुझे नाव किती उत्कृष्ट आहे!

स्तोत्रसंहिता — Chapters