Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:18

[1] हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी तुझ्याठायी आश्रय घेतो! माझा पाठलाग करणाऱ्यांपासून मला वाचव आणि मला सोडव.

[2] नाहीतर ते मला सिंहासारखे फाडून टाकतील. वाचवायला कोणी समर्थ नसणार, म्हणून ते माझे तुकडे तुकडे करतील.

[3] परमेश्वरा माझ्या देवा, मी असे काही केले नाही जे शत्रू सांगतात, माझ्या हाती काही अन्याय नाही.

[4] माझ्याशी शांतीने राहणाऱ्याचे मी कधीही वाईट केले नाही. किंवा माझ्याविरोधात जे होते त्यांना इजा केली नाही.

[5] जर मी खरे सांगत नसेल तर, माझे शत्रू माझ्या जीवाच्या पाठीस लागो आणि त्यास गाठून घेवो. तो माझा जीव मातीत तुडवो आणि माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवो.

[6] हे परमेश्वरा, आपल्या क्रोधाने उठ; माझ्या विरोध्यांच्या संतापामुळे उभा राहा, माझ्यासाठी जागा हो आणि तुझ्या न्यायाचा आदेश जो तू आज्ञापीले आहे तो पूर्णत्वास ने.

[7] राष्ट्रांची सभा तुझ्याभोवती येवो, आणि पुन्हा तू त्यांच्यावरती आपले योग्य ठिकाण घे.

[8] परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करतो, परमेश्वरा, मला समर्थन दे, आणि माझ्या न्यायीपणाप्रमाणे आणि माझ्या स्वतःच्या सात्त्विकतेप्रमाणे माझा न्याय कर.

[9] दुष्टांच्या वाईट कृत्यांचा अंत होवो, परंतु धार्मिकाला स्थापित कर. कारण न्यायी देव हृदय व अंतर्यामे पारखणारा आहे.

[10] जो सरळ हृदयाच्यांना तारतो त्या देवापाशी माझी ढाल आहे.

[11] देव न्यायी न्यायाधीश आहे, असा देव जो प्रतिदिवशी न्यायाने रागावतो.

[12] जर मनुष्याने पश्चाताप केला नाही तर, देव त्याच्या तलवारीला धार लावणार आणि त्याचा धनुष्य युद्धासाठी तयार करणार.

[13] त्याने आपली प्राणघातक शस्त्रे तयार केली आहेत. तो आपले अग्नीबान तयार करतो.

[14] त्यांचा विचार कर जे दुष्टपणाने गरोदर झाले आहेत. जे विध्वंसक योजनांची गर्भधारणा करतात, जे अपायकारक लबाडीला जन्म घालतात.

[15] त्याने खड्डा खोदला आणि तो खोल खोदला, आणि त्याने जो खड्डा केला त्यामध्ये तोच पडला.

[16] त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.

[17] मी परमेश्वरास त्याच्या न्यायीपणाप्रमाणे धन्यवाद देईन, मी परात्पर परमेश्वराच्या नावाची स्तुती गाईन.

स्तोत्रसंहिता — Chapters