Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:50

[1] देवाने आमच्यावर दया करावी आणि आम्हांस आशीर्वाद द्यावा. आणि त्याने आमच्यावर आपला मुखप्रकाश पाडावा.

[2] याकरिता की, तुझे मार्ग पृथ्वीवर माहित व्हावेत, तुझे तारण सर्व राष्ट्रामध्ये कळावे.

[3] हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.

[4] राष्ट्रे हर्ष करोत आणि हर्षाने गावोत, कारण तू लोकांचा न्याय सरळपणे करशील आणि राष्ट्रावर राज्य करशील.

[5] हे देवा, लोक तुझी स्तुती करोत; सर्व लोक तुझी स्तुती करोत.

[6] भूमीने आपला हंगाम दिला आहे आणि देव, आमचा देव, आम्हास आशीर्वाद देवो.

[7] देव आम्हास आशीर्वाद देवो आणि पृथ्वीवरील सर्व सीमा त्याचा सन्मान करोत.

स्तोत्रसंहिता — Chapters