Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:55

[1] देव दैवी मंडळीत उभा आहे, तो देवांच्यामध्ये न्याय देतो.

[2] कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल? आणि दुष्टांना पक्षपातीपणा दाखवाल?

[3] गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे; त्या पीडित व दरिद्री यांच्या हक्काचे पालन करा.

[4] त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.

[5] “ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत; ते अंधारात इकडेतिकडे भटकत राहतात; पृथ्वीचे सर्व पाये ढासळले आहेत.”

[6] मी म्हणालो, “तुम्ही देव आहात, आणि तुम्ही सर्व परात्पराची मुले आहात.”

[7] तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल, आणि एखाद्या सरदारासारखे तुम्ही पडाल.

[8] हे देवा, ऊठ! पृथ्वीचा न्याय कर, कारण तू सर्व राष्ट्रे वतन करून घेशील.

स्तोत्रसंहिता — Chapters