Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 0:47

[1] जो प्रत्येकजन परमेश्वराचा आदर करतो, जो त्याच्याच मार्गाने चालतो तो धन्यवादित आहे.

[2] तू आपल्या हाताच्या श्रमाचे फळ खाशील, तू आनंदित होशील; तू आशीर्वादित होऊन तुझी भरभराट होईल.

[3] तुझी पत्नी तुझ्या घरात फलदायी द्राक्षवेलीसारखी होईल; तुझी मुले तुझ्या मेजाभोवती बसलेल्या जैतूनाच्या रोपांसारखी होतील.

[4] होय, खरोखर, जो मनुष्य परमेश्वराचा आदर करतो, तो असा आशीर्वादित होईल.

[5] परमेश्वर तुला सियोनेतून आशीर्वाद देवो; तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरूशलेमेची उन्नती तुझ्या दृष्टीस पडो.

[6] तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलावर शांती असो.

स्तोत्रसंहिता — Chapters