Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 1:32

[1] हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.

[2] हे सतार आणि वीणे, तुम्ही जागृत व्हा. मी पहाटेला जागे करीन.

[3] हे परमेश्वरा, मी तुला लोकांमध्ये धन्यवाद देईन; मी राष्ट्रांमध्ये तुझी स्तुतीगान गाईन.

[4] कारण तुझा महान विश्वासाचा करार आकाशाहून उंच आहे; आणि तुझी सत्यता आकाशाला पोहचली आहे.

[5] हे देवा, तू आकांशाच्यावर उंचावलेला आहे. आणि तुझी महिमा सर्व पृथ्वीवर होवो.

[6] म्हणून ज्यांना तू प्रेम करतो त्यांनी वाचावे, तुझ्या उजव्या हाताने आम्हास वाचव आणि मला उत्तर दे.

[7] देव आपल्या पवित्रतेत म्हणाला, “मी उल्लासेन; मी शखेम विभागीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.

[8] गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे. एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे. यहूदा माझा राजदंड आहे.

[9] मवाब माझे स्नानाचे पात्र आहे. अदोमावर मी आपले पादत्राण फेकीन. मी पलिष्टीया विषयी विजयाने आरोळी करीन.”

[10] तटबंदीच्या नगरात मला कोण घेऊन जाईल? मला अदोमात कोण नेईल?

[11] हे देवा, तू आम्हास नाकारले नाही का? तू आमच्या सैन्याबरोबर युद्धास गेला नाहीस.

[12] आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत दे, कारण मनुष्याची मदत निष्फळ आहे.

[13] देवाच्या मदतीने आम्ही विजयी होऊ; तो आपल्या शत्रूला पायाखाली तुडवील.

स्तोत्रसंहिता — Chapters