[1] उन्हाळ्यात जसे बर्फ किंवा कापणीच्यावेळी पाऊस, त्याचप्रमाणे मूर्खाला सन्मान शोभत नाही.
[2] जशी भटकणारी चिमणी आणि उडणारी निळवी, याप्रमाणे विनाकारण दिलेला शाप कोणावरही येत नाही.
[3] घोड्याला चाबूक, गाढवाला लगाम, आणि मूर्खाच्या पाठीला काठी आहे.
[4] मूर्खाला उत्तर देऊ नको आणि त्याच्या मूर्खपणात सामील होऊ नकोस, किंवा देशील तर तू त्यांच्यासारखाच होशील.
[5] मूर्खाला उत्तर दे आणि त्याच्या मूर्खतेत सामील हो, नाहीतर तो आपल्या स्वतःच्या दृष्टीने शहाणा होईल.
[6] जो कोणी मूर्खाच्या हाती निरोप पाठवतो, तो आपले पाय कापून टाकतो आणि तो उपद्रव पितो.
[7] पांगळ्याचे पाय जसे खाली लोंबकळतात तसे मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन आहे.
[8] मूर्खाला आदर देणारा, गोफणीत दगड बांधण्याऱ्यासारखा आहे.
[9] मूर्खाच्या तोंडचे नीतिवचन, झिंगलेल्याच्या हातात रुतलेल्या काट्यासारखे आहे.
[10] एखादा तिरंदाज प्रत्येकाला जखमी करतो, तसेच जो मूर्खाला किंवा जवळून आल्या गेल्यास मोलाने काम करायला लावतो तो तसाच आहे.
[11] जसा कुत्रा आपल्या स्वतःच्या ओकीकडे फिरतो. तसा मूर्ख आपली मूर्खता पुन्हा करतो.
[12] आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
[13] आळशी मनुष्य म्हणतो, “रस्त्यावर सिंह आहे!” तेथे उघड्या जागेमध्ये सिंह आहे.
[14] दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.
[15] आळशी आपला हात ताटात घालून ठेवतो, आणि तरी त्यास आपला हात तोंडापर्यंत नेण्यास शक्ती नसते.
[16] विवेक दृष्टी असणाऱ्या सात मनुष्यांपेक्षा आळशी मनुष्य आपल्या दृष्टीने शहाणा समजतो.
[17] जो दुसऱ्यांच्या वादात पडून संतप्त होतो, तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान धरुन ओढणाऱ्यासारखा आहे.
[18] जो कोणी मूर्खमनुष्य जळते बाण मारतो,
[19] तो अशा मनुष्यासारखा आहे जो आपल्या एका शेजाऱ्याला फसवतो, आणि म्हणतो, मी विनोद सांगत नव्हतो काय?
[20] लाकडाच्या अभावी, अग्नी विझतो. आणि जेथे कोठे गप्पाटप्पा करणारे नसतील तर भांडणे थांबतात.
[21] जसे लोणारी कोळसा जळत्या कोळश्याला आणि लाकडे अग्नीला, त्याचप्रमाणे भांडण पेटवायला भांडखोर लागतो.
[22] गप्पाटप्पा करणाऱ्याचे शब्द स्वादिष्ट पक्वान्नासारखे असतात. ते पोटाच्या आंतील भागापर्यंत खाली जातात.
[23] जसे वाणी कळवळ्याची आणि दुष्ट हृदय असणे, हे मातीच्या पात्राला रुप्याचा मुलामा दिल्यासारखे आहे.
[24] जो कोणी प्रबंधाचा द्वेष करतो तो आपल्या ओठांनी आपल्या भावना लपवतो, आणि तो आपल्या अंतर्यामात कपट बाळगतो;
[25] तो विनम्रपणे बोलेल, पण त्याच्यावर विश्वास ठेवू नका, कारण त्याच्या हृदयात सात घृणा आहेत;
[26] तरी त्याचा द्वेष कपटाने झाकला जाईल, आणि दुष्टपणा मंडळीसमोर उघड केला जाईल.
[27] जो कोणी खड्डा खणतो तो तिच्यात पडेल, आणि जो धोंडा लोटतो त्याच्यावर तो उलट येईल.
[28] लबाड बोलणारी जिव्हा आपण चिरडून टाकलेल्या लोकांचा द्वेष करते, आणि फाजील स्तुती करणारे तोंड नाशाला कारण होते.