Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 4:20

[1] नंतर अलीफज तेमानीने उत्तर दिले आणि म्हणाला,

[2] “शहाणा मनुष्य, वायफळ शहाणपणाचे उत्तर देणार काय, आणि पूर्वे कडील वाऱ्याने स्वतःला भरेल का?

[3] तो ज्यात काही लाभ नाही अशा निरुपयोगी कारणास्तव बोलेल काय किंवा जे सांगण्यास योग्य नाही असा उपदेश करेल काय?

[4] खरोखर, तू देवाचा आदर करणे सोडले आहेस, त्याच्या भक्तीत तू खीळ घालत आहेस.

[5] तुझे पाप तुझ्या मुखाला बोलण्यास शिकविते, तू तुझ्यासाठी अधर्माची जीभ निवडली आहे.

[6] मी नव्हे, तुझेच स्वमुख तुला दोषी मानत आहे. खरोखर, तुझे स्वत:चेच ओठ तुझ्याविरुध्द साक्ष देतात

[7] तूच प्रथम मनुष्य असा जन्माला आलास काय? टेकड्या निर्माण व्हायच्या आधीच तू जन्मलास का?

[8] तू देवाच्या गुप्त मसलती ऐकल्यास का? केवळ तूच एक शहाणा मनुष्य आहेस असे तुला वाटते का?

[9] आम्हास समजत नाही असे तुला काय माहीती आहे? आम्हास अवगत नाही असे काय तुला माहीत आहे?

[10] केस पांढरे झालेले लोक आणि वृध्द आमच्याशी सहमत आहेत. होय, तुझ्या वडिलांपेक्षा वृध्द असलेले लोक आमच्यात आहेत.

[11] देवाने केलेले सांत्वन आणि तुजशी केलेली सौम्य भाषण तुला तुच्छ वाटतात काय?

[12] तुझे मन तुला का मार्ग भ्रष्ट करीत आहे? तू डोळे का फिरवितोस,

[13] तू असा तुझा आत्त्मा देवाच्या विरुध्द का फिरवतोस आणि तुझ्या तोंडा वाटे असे शब्द का येतात.

[14] मनुष्य तो काय, जो निष्कलंक असेल? स्त्री पासून जन्मलेला मनुष्य तो निष्पाप कसा असणार?

[15] पहा, देवाच्या नजरेत आकाशही स्वच्छ नाही, खरोखर, देव त्याच्या पवित्र जनांचाही विश्वास करत नाही.

[16] असा मनुष्य जो अधर्म पाण्यासारख्या पितो, अशुद्ध आणि अप्रामाणिक असा मनुष्य तो काय?

[17] माझे ऐक, मी तुला समजावून सांगतो, मी पाहिलेल्या गोष्टी तुम्हास सांगतो.

[18] विद्वानांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, त्या मी तुला सांगतो. विद्वानाच्या पूर्वजांनी त्यांना या गोष्टी सांगितल्या. त्यांनी माझ्यापासून कुठलीही गुप्त गोष्ट लपवून ठेवली नाही.

[19] ती भूमी त्याच्या पूर्वजांना दिलेली होती, ज्यात एकटेच राहत होते, आणि त्या मधून कोणी परदेशी कधीही जाऊ शकत नव्हते.

[20] दुष्ट मनुष्याचे सर्व दिवस वेदनात फिरवले जातात, जुलम्याचे जीवनाची वर्ष यातना भोगण्यासाठीच असतात.

[21] भीतीचा आवाज त्याच्या कानात आहे, जेव्हा तो समृद्धीत असेल, नाश करणारा त्याच्यावर येईल.

[22] अंधारातून बाहेर येण्याची तो खात्री करत नाही, त्याच्याकरिता तलवार वाट पाहत आहे.

[23] ते कुठे आहे? असे म्हणत तो भाकरीसाठी इकडे तिकडे भटकतो, अंधकाराचा दिवस हाताशी आहे हे तो जाणतो.

[24] संकटे आणि दु:ख त्यास भित्रा बनवतात, हाल करण्यासाठी तयार असलेल्या राजा प्रमाणे ते त्याच्या विरूद्ध यश पावतात.

[25] कारण त्याने देवाच्या विरूद्ध त्याचा हात उगारला आहे, आणि सर्वशक्तिमान देवाच्या विरूद्ध तो गर्वाने वागत आहे.

[26] हा दुष्ट मनुष्य ताठ मानेन, जड उंच वाटे असलेली ढाल घेऊन देवाकडे धावतो,

[27] त्याचा चेहरा त्याने आपल्या चारबीने जरी झाकून घेतला आणि आपली चरबी त्याने कंबरेत साठवली,

[28] आणि उद्वस्त शहरात राहतो, ज्या घरात माणसे राहतात, आणि आत्ता ते मातीचे ढीग होण्यास तयार आहे.

[29] तरी तो श्रीमंत होणार नाही, त्याची संपती पण टिकणार नाही, त्याची सावली पण त्यास सोडून जाईल.

[30] त्याची काळोखापासून सुटका नाही, आग्नीने त्याच्या फांद्या सुकतील, देवाच्या मुख श्वासाने तो दूर जाईल.

[31] निरुपयोगी गोष्टींवर त्याने विश्वास ठेवून स्वत:चीच फसवणूक करून घेऊ नये. निरउपयोगीता त्याचे बक्षीस होईल.

[32] आयुष्य संपण्याच्या आधीच दुष्ट मनुष्य म्हातारा आणि शुष्क झालेला असेल. तो पुन्हा कधीही हिरव्या न होणाऱ्या फांदीसारखा असेल.

[33] न पिकलेले द्राक्ष जसे अकाली गळून पडतात त्या वेलीसारखा तो होईल, जैतून झाडाच्या फुला प्रमाणे त्याची फुले गळतील.

[34] अधर्म्याचे घराणे फळ द्रूप होणार नाही लाचलुचूपताचे तंबू आगीत भस्मसात होतात.

[35] ते अपकाराची गर्भधारणा करतात आणि अधर्मास जन्म देतात, त्यांच्या उदरात लबाडीचा गर्भ आहे.”

ईयोब — Chapters