[1] ज्या दिवशी मोशेने निवासमंडपाचे काम संपविले, त्याने तो अभिषेक करून व परमेश्वराच्या उपयोगासाठी त्यातील सर्व एकत्रित साहित्यासह पवित्र केला. त्याने वेदी व त्यातील सर्व पात्रे अभिषेक करून पवित्र केली. त्याने त्यास अभिषेक केला व त्यास पवित्र केले.
[2] त्यादिवशी, जे इस्राएलांचे अधिपती, त्यांच्या पूर्वजांच्या घराण्यांचे प्रमुख होते त्यांनी अर्पणे अर्पिली; हीच माणसे जमातीचे नेतृत्व करणारे होते. याच लोकांनी शिरगणतीचे काम पाहिले होते.
[3] त्यांनी परमेश्वरापुढे अर्पणे आणली. त्यांनी झाकलेल्या सहा गाड्या व बारा बैल आणले. त्यांनी प्रत्येक दोन अधिपतीसाठी एक गाडी व प्रत्येक अधिपतीसाठी एक बैल दिला. त्यांनी या वस्तू निवासमंडपासमोर सादर केल्या.
[4] मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला
[5] “त्यांच्यापासून अर्पणे स्विकार आणि दर्शनमंडपाच्या कामासाठी अर्पणांचा उपयोग कर. प्रत्येक लेवीला ज्याच्या त्याच्या कामाच्या आवश्यकतेनुसार अर्पण दे.”
[6] मोशेने गाड्या व बैल घेतले आणि ते लेवींना दिले.
[7] त्याने दोन गाड्या व चार बैल गेर्षोनी वंशाना दिले कारण त्यांच्या कामासाठी त्यांना त्यांची गरज होती.
[8] त्याने चार गाड्या व आठ बैल मरारी वंशाना दिले, ते अहरोन याजकाचा मुलगा इथामार ह्याच्या देखरेखीखाली होते. त्याने हे अशासाठी केले की त्यांना त्याची गरज होती.
[9] परंतु त्याने कहाथी वंशाना त्यातील काहीच दिले नाही, कारण निवासमंडपातील राखीव वस्तू आणि साहित्य याच्या संबंधीत त्यांचे काम असून, त्या वस्तू आपल्या स्वतःच्या खांद्यावर वाहून नेण्याचे होते.
[10] मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी अधिपतींनी वेदीला आपला माल समर्पित करण्यासाठी आणला. अधिपतींनी आपली अर्पणे वेदीसमोर अर्पिली.
[11] परमेश्वर मोशेला म्हणाला, “प्रत्येक अधिपतीनी आपल्या स्वतःच्या दिवशी, वेदीच्या समर्पणासाठी आपले अर्पण आणावे.”
[12] पहिल्या दिवशी, यहूदा वंशाचा अधिपती अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[13] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी आणली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[14] त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे, एक सोन्याचे पात्र आणले.
[15] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[16] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[17] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यासाठी दिली. हे अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन याची भेट होती.
[18] दुसऱ्या दिवशी, इस्साखार वंशाचा, अधिपती सूवाराचा मुलगा नथनेल, ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[19] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी अर्पिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[20] त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[21] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरु ही होमार्पणासाठी दिली.
[22] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[23] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सूवाराचा मुलगा नथनेल याची भेट होती.
[24] तिसऱ्या दिवशी, जबुलून वंशाचा अधिपती हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[25] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी दिली. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[26] त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[27] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[28] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[29] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याचे अर्पण होते.
[30] चौथ्या दिवशी, रऊबेन वंशाचा अधिपती शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[31] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[32] त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
[33] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा आणि एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिले.
[34] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[35] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याचे अर्पण होते.
[36] पांचव्या दिवशी, शिमोन वंशाचा अधिपती सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[37] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होते. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[38] त्यानेही धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र अर्पिले.
[39] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[40] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[41] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल यांचे अर्पण होते.
[42] सहाव्या दिवशी, गाद वंशाचा अधिपती दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[43] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेल्या होत्या.
[44] त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[45] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[46] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[47] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे ही अर्पिण्यास दिली, हे दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याचे अर्पण होते.
[48] सातव्या दिवशी, एफ्राईम वंशाचा अधिपती अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[49] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[50] त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[51] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[52] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[53] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा यांचे अर्पण होते.
[54] आठव्या दिवशी, मनश्शे वंशाचा अधिपती पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[55] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[56] त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[57] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[58] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[59] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे पदाहसुराचा मुलगा गमलीयेल याचे अर्पण होते.
[60] नवव्या दिवशी, बन्यामीन वंशाचा अधिपती गीदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[61] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[62] त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[63] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[64] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[65] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याचे अर्पण होते.
[66] दहाव्या दिवशी, दान वंशाचा अधिपती अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[67] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[68] त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[69] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[70] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[71] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिले. हे अम्मीशाद्दै याचा मुलगा अहीएजर ह्याचे अर्पण होते.
[72] अकराव्या दिवशी, आशेर वंशाचा अधिकारी आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[73] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाची चांदीची एक वाटी होती. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[74] त्याने धूपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[75] त्याने होमार्पणासाठी एक गोऱ्हा, एक मेंढा व एक वर्षाचे नर कोकरू दिले.
[76] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[77] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे आक्रानाचा मुलगा पगीयेल याचे अर्पण होते.
[78] बाराव्या दिवशी, नफताली वंशाचा अधिपती एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे अर्पिली.
[79] त्याचे अर्पण पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशेतीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट व सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा होता. त्या दोन्ही वस्तू अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरलेल्या होत्या.
[80] त्याने धूपाने भरलेले, दहा शेकेल वजनाचे एक सोन्याचे पात्र दिले.
[81] त्याने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे एक नर कोकरू ही होमार्पणासाठी दिली.
[82] त्याने पापार्पणासाठी एक बकरा दिला.
[83] त्याने शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक वर्षाची पाच नर कोंकरे अर्पिण्यास दिली. हे एनानाचा मुलगा अहीरा याचे अर्पण होते.
[84] मोशेने वेदीला अभिषेक केला त्या दिवशी इस्राएलांच्या अधिपतींनी या सर्व वस्तू समर्पित केल्या. त्यांनी चांदीची बारा ताटे, चांदीच्या बारा वाट्या आणि सोन्याची बारा पात्रे समर्पित केली.
[85] प्रत्येक चांदीच्या ताटाचे वजन एकशेतीस शेकेल व प्रत्येक चांदीच्या वाट्यांचे वजन सत्तर शेकेल होते. पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे चांदीची ताटे व चांदीच्या वाट्या मिळून त्यांचे एकूण वजन दोन हजार चारशे शेकेल होते.
[86] धूपाने भरलेले सोन्याची बारा पात्रे, प्रत्येकी पवित्रस्थानाच्या शेकेलाप्रमाणे दहा शेकेल वजन होते.
[87] त्यांनी होमार्पणासाठी बारा गोऱ्हे, बारा मेंढे व एक वर्षाची बारा नर कोंकरे समर्पित केली. त्यांनी आपले अन्नार्पण दिले. त्यांनी पापार्पणासाठी बारा बकरे दिले.
[88] शांत्यर्पणाच्या अर्पणासाठी त्यांनी आपल्या सर्व गुराढोरातून चोवीस बैल, साठ मेंढे, साठ बकरे व एक वर्षाची साठ नर कोंकरे दिली. जेव्हा अभिषेक झाला होता, तेव्हा त्यांनी ही वेदीला अर्पणे केली.
[89] जेव्हा मोशे परमेश्वराबरोबर बोलण्यासाठी दर्शनमंडपामध्ये गेला, त्यावेळी त्याने देवाची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. देव साक्षीकोशावर जे दयासन होते त्यावरून म्हणजे दोन करुबांच्या मधून आपणाशी बोलणारी वाणी ऐकली. परमेश्वर त्याच्याशी बोलला.