Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 12:55

[1] मरी येऊन गेल्यानंतर परमेश्वर मोशे आणि अहरोनाचा मुलगा याजक एलाजार यांच्याशी बोलला. तो म्हणाला,

[2] “इस्राएलात, वीस वर्षाचे आणि वीस वर्षांवरील अधिक वयाचे असून युध्दास जाण्याच्या लायकीचे असतील त्या सगळ्या मंडळीची त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे मोजणी करा.”

[3] तेव्हा मोशे आणि याजक एलाजार त्याच्याशी बोलले यरीहोपाशी यार्देन नदीतीरी मवाबाच्या मैदानात त्यांना बोलले, ते म्हणाले,

[4] मोशे आणि जे इस्राएल लोक, मिसर देशातून बाहेर आले होते त्यांना परमेश्वराने ही आज्ञा दिल्याप्रमाणे, वीस वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची तुम्ही मोजणी करा.

[5] रऊबेन हा इस्राएलाचा पहिला जन्मलेला मुलगा होता. रऊबेनाच्या मुलांपासून जी कुळे आली ती कुळे म्हणजे: हनोखाचे हनोखी कूळ, पल्लूचे पल्लूवी कूळ.

[6] हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, कर्मीचे कर्मी कूळ.

[7] रऊबेनाच्या वंशातील ही कुळे. त्यामध्ये एकूण त्रेचाळीस हजार सातशे तीस भरली.

[8] पल्लूचा मुलगा अलीयाब.

[9] अलीयाबाची मुले नमुवेल, दाथान व अबीराम. दाथान व अबीराम हे दोन पुढारी मोशेच्या आणि अहरोनाच्या विरूद्ध गेले होते. कोरह जेव्हा परमेश्वराच्या विरूद्ध गेला तेव्हा त्यांनी कोरहाला पाठींबा दिला.

[10] त्यावेळी ती अडीचशे माणसे अग्नीने खाऊन टाकली, त्याचे सर्व अनुयायी मरण पावले तेव्हा धरतीने आपले तोंड उघडले आणि तिने कोरहासह त्यांना गिळून टाकले. ते इशाऱ्याचे चिन्ह असे झाले.

[11] परंतु कोरहाच्या कुळातले इतर लोक मात्र मरण पावले नाहीत.

[12] शिमोनाच्या कुळातलीही काही कुळेः नमुवेलाचे नमुवेली कूळ, यामीनाचे यामीनी कूळ, याकीनाचे याकीनी कूळ,

[13] जेरहाचे जेरही कूळ, शौलाचे शौली कूळ.

[14] ही शिमोनी वंशातील कुळे. ते एकूण बावीस हजार दोनशे.

[15] गाद कुळातून जी कुळे निर्माण झाली ती अशीः सफोनाचे सफोनी कूळ, हग्गीचे हग्गी कूळ, शूनीचे शूनी कूळ,

[16] आजनीचे आजनी कूळ, एरीचे एरी कूळ,

[17] अरोदाचे अरोदी कूळ. अरलीचे अरेली कूळ.

[18] गादच्या वंशातील ही कूळे. त्यामध्ये एकूण चाळीस हजार पाचशे पुरुष होते.

[19] जेरहाचे जेरही कूळ. यहूदाची दोन मुले एर आणि ओनान हे कनान मध्ये मरण पावले.

[20] यहूदाच्या कुळातून जी कूळे निर्माण झाली ती अशीः शेलाचे शेलानी कूळ, पेरेसाचे पेरेसी कूळ, जेरहाचे जेरही कूळ

[21] पेरेसाच्या कुळातील ही कुळेः हेस्रोनाचे हेस्रोनी कूळ, हामूलाचे हामूली कूळ.

[22] ही यहूदाच्या कुळातील कुळे. त्यामध्ये एकूण शहात्तर हजार पाचशे पुरुष होते.

[23] इस्साखाराच्या कुळातील काही कुळे अशी:तोलाचे तोलाई कूळ पूवाचे पुवाई कूळ.

[24] याशूबाचे याशूबी कूळ, शिम्रोनाचे शिम्रोनी कूळ.

[25] इस्साखाराच्या कुळातील ही कुळे. त्यामध्ये एकूण चौसष्ट हजार तीनशे पुरुष होते.

[26] जबुलूनाच्या कुळातील कुळेः सेरेदचे सेरेदी कूळ, एलोनाचे एलोनी कूळ, याहलेलचे याहलेली कूळ.

[27] जबुलूनाच्या कुळातील ही कुळे, त्यामध्ये एकूण साठ हजार पाचशे पुरुष होते.

[28] योसेफाची मुले मनश्शे व एफ्राईम. या प्रत्येकापासून कुळे निर्माण झाली.

[29] मनश्शेच्या कुळातील कुळेः माखीराचे, माखीरी कूळ (माखीर गिलादाचा बाप होता), गिलादाचे गिलादी कूळ.

[30] गिलादाची कूळे होतीः इयेजेराचे इयेजेरी कूळ, हेलेकाचे हेलेकी कूळ.

[31] अस्रियेलाचे अस्रियेली कूळ, शेखेमाचे शेखेमी कूळ.

[32] शमीदचे शमीदाई कूळ, हेफेराचे हेफेरी कूळ.

[33] हेफेराचा मुलगा सलाफहाद याला मुले नव्हती, फक्त मुली होत्या. त्याच्या मुलींची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.

[34] ही मनश्शेच्या कुळातील कुळे होती ते एकूण बावन्न हजार सातशे पुरुष होते.

[35] एफ्राइमाच्या कुळातील घराणी पुढीलप्रमाणे होती, शूथेलाहाचे शूथेलाही कूळ. बेकेराचे बेकेरी कूळ व तहनाचे तहनी कूळ.

[36] एरान शूथेलाहाच्या कुटुंबातील होता. एरानाचे कूळ एरानी.

[37] ही एफ्राइमाच्या कुळातील कुळे: त्यामध्ये बत्तीस हजार पाचशे पुरुष होते. ते सगळे योसेफाच्या कुळातील होते.

[38] बन्यामीनाच्या कुळातील कुळे होतीः बेलाचे बेलाई कूळ, आशबेलाचे आशबेली कूळ, अहीरामाचे अहीरामी कूळ.

[39] शफूफामाचे शफूफामी कूळ, हुफामाचे हुफामी कूळ.

[40] बेला ह्याचे पुत्र आर्द व नामान हे होते. आर्दीचे आर्दी कूळ, नामानाचे नामानी कूळ.

[41] ही सगळी कुळे बन्यामीनाच्या कुळातील. त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार सहाशे होती.

[42] दानाच्या कुळातील कुळे होती: शूहामाचे शूहामी कूळ. ही कूळे दानाच्या कुळातील होते.

[43] शूहामीच्या कुळात अनेक कुळे होती. त्यातील पुरुषांची संख्या चौसष्ट हजार चारशे होती.

[44] आशेराच्या कुळातील कुळे होतीः इम्नाचे इम्नाई कूळ, इश्वीचे इश्वी कूळ, बरीयाचे बरीयाई कूळ.

[45] बरीयाच्या कुळातील कुळे होतीः हेबेराचे हेबेरी कूळ, मलकीएलाचे मलकीएली कूळ.

[46] आशेरला सेरा नावाची मुलगी होती.

[47] ही सगळे लोक आशेराच्या कुळातील होते. त्यातील पुरुषांची संख्या त्रेपन्न हजार चारशे होती.

[48] नफतालीच्या कुळातील कुळे होतीः यहसेलाचे यहसेली कूळ, गूनीचे गूनी कूळ.

[49] येसेराचे येसेरी कूळ, शिल्लेमाचे शिल्लेमी कूळ.

[50] ही नफतालीच्या कुळातील कुळे, त्यातील पुरुषांची संख्या पंचेचाळीस हजार चारशे होती.

[51] ही इस्राएलामधील मोजलेली पूर्ण पुरुषांची संख्या सहा लाख एक हजार सातशे तीस होती.

[52] परमेश्वर मोशेशी बोलला व म्हणाला,

[53] त्यांच्या नावाच्या संख्येप्रमाणे वतनासाठी देश वाटून द्यायचा आहे.

[54] मोठ्या कुळाला जास्त वतन मिळेल आणि लहान कुळाला कमी वतन मिळेल. त्यांना जे वतन मिळेल ती त्या कुळात मोजलेल्या मनुष्यांच्या समप्रमाणात असेल.

[55] देश चिठ्ठ्या टाकून वाटायचा आहे त्यांच्या वडिलांच्या वंशाच्या नावांप्रमाणे त्यांनी वतन करून घ्यावा.

[56] प्रत्येक लहान आणि मोठ्या कुळाला वतन मिळेल आणि निर्णय करण्यासाठी तू चिठ्ठ्या टाकशील.

[57] त्यांनी लेव्याच्या कुळातील, कुळांचीही गणती केली, ती ही होतीः गेर्षोनाचे गेर्षोनी कूळ, कहाथाचे कहाथी कूळ, मरारीचे मरारी कूळ.

[58] लेव्याची ही कूळे होतीः लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, आणि कोरही कूळ. अम्राम कहाथाच्या कुळातील होता.

[59] अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते. ती सुद्धा लेव्याच्या कुळातील होती. ती मिसर देशात जन्मली. अम्राम आणि योखाबेदला दोन मुले: अहरोन आणि मोशे. त्यांना एक मुलगीही होती. तिचे नाव मिर्याम.

[60] नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांचे अहरोन वडील होते.

[61] पण नादाब व अबीहू हे परमेश्वरासमोर अन्य अग्नी अर्पीत असताना मरण पावले.

[62] लेव्याच्या कुळातील एकूण पुरुषांची संख्या तेवीस हजार होती. परंतु यांची गणती इस्राएलाच्या इतर लोकांबरोबर केली नाही. परमेश्वराने इतर लोकांस वतन दिले त्यामध्ये यांना हिस्सा मिळाला नाही.

[63] मोशे आणि याजक एलाजार यांनी जे मोजले ते हेच आहेत. त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनवर इस्राएलाच्या वंशाची मोजणी केली.

[64] खूप वर्षांपूर्वी सीनायाच्या वाळवंटात मोशे आणि याजक अहरोन यांनी इस्राएल लोकांची गणती केली होती. पण ते सगळे लोक आता मरण पावले होते. त्यापैकी कोणीही आता जिवंत नव्हते.

[65] कारण इस्राएल लोकांस तुम्ही रानात मराल असे परमेश्वराने सांगितले होते. फक्त दोन पुरुषांना परमेश्वराने जिवंत ठेवले होते. यफुन्नेचा मुलगा कालेब व नूनाचा मुलगा यहोशवा होते.

गणना — Chapters