Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 10:58

[1] इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपामध्ये परमेश्वर मोशेशी बोलला; परमेश्वर म्हणाला,

[2] सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीची शिरगणती कर; प्रत्येक पुरुषाचे नांव, त्याचे कूळ आणि त्याच्या वाडवडिलांचे घराणे ह्याच्यासह त्यांच्या नावांची यादी कर.

[3] वीस वर्षाचे किंवा त्याहून अधिक वयाचे जितके पुरुष सैन्यात जाण्यायोगे इस्राएलात असतील त्या सर्वाची त्यांच्या सैन्याप्रमाणे तू आणि अहरोन मिळून गणती करा.

[4] प्रत्येक वंशातला एक पुरुष जो आपल्या वडिलांच्या घराण्याचा प्रमुख असेल तो तुम्हास मदत करील.

[5] तुमच्याबरोबर राहून तुम्हास मदत करणाऱ्यांची नावे हीः रऊबेन वंशातला, शदेयुराचा मुलगा अलीसूर;

[6] शिमोन वंशातला सुरीशाद्दैचा मुलगा शलूमीयेल.

[7] यहूदा वंशातला अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन;

[8] इस्साखार वंशातला सुवाराचा मुलगा नथनेल;

[9] जबुलून वंशातला हेलोनाचा मुलगा अलीयाब.

[10] योसेफ पुत्राच्या वंशात म्हणजे एफ्राइम वंशातला अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा, आणि मनश्शे वंशातला पदाहसुराचा मुलगा गमलीयेल.

[11] बन्यामीन वंशातला गिदोनीचा मुलगा अबीदान.

[12] दान वंशातला अम्मीशाद्दैचा मुलगा अहीएजर;

[13] आशेर वंशातला आक्रानाचा मुलगा पागीयेल;

[14] गाद वंशातला दगुवेलाचा मुलगा एल्यासाप;

[15] नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा.

[16] हे लोकांतून निवडलेले माणसे होती, त्यांच्या पूर्वजांच्या वंशाचे अधिपती होते. ते इस्राएलाच्या कुळाचे प्रमुख होते.

[17] ज्यांच्या नावाची नोंद होती त्या मनुष्यांना मोशे व अहरोन ह्यानी आपल्याबरोबर घेतले;

[18] आणि त्यांनी दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्व मंडळीस एकत्र जमविले; मग इस्राएलाच्या कुळांप्रमाणे व त्यांच्या वडिलांच्या घराण्यांप्रमाणे त्यांची नोंद करण्यात आली. वीस किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांची यादी करण्यात आली.

[19] परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे त्याने सीनाय रानात त्यांची गणती केली.

[20] इस्राएलाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन ह्याच्या वंशाचे लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी त्यांची गणना करण्यात आली. ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली; त्यांची यादी घराणी आणि कुळे ह्याच्याप्रमाणे करण्यात आली.

[21] रऊबेनाच्या वंशातले मोजलेले एकूण शेहेचाळीस हजार पाचशे भरली.

[22] शिमोन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून सैन्यात दाखल होण्यास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;

[23] शिमोनाच्या वंशातले मोजलेले एकूण एकोणसाठ हजार तीनशे भरली.

[24] गाद वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्यांची यादी करण्यात आली;

[25] गादाच्या वंशातले मोजलेले एकूण पंचेचाळीस हजार सहाशे पन्नास भरली.

[26] यहूदा वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यापेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते, त्या सर्वाची नोंद करण्यात आली;

[27] यहूदाच्या वंशातले मोजलेले एकूण चौऱ्याहत्तर हजार सहाशे भरली.

[28] इस्साखार वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वाची नोंद करण्यात आली;

[29] इस्साखाराच्या वंशातले मोजलेले एकूण चौपन्न हजार चारशे भरली.

[30] जबुलून वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोद करण्यात आली;

[31] जबुलून वंशातील मोजदाद एकूण सत्तावन्न हजार चारशे भरली.

[32] योसेफ पुत्रांपैकी एफ्राइम वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

[33] एफ्राइमाच्या वंशातले मोजलेले एकूण चाळीस हजार पाचशे भरली.

[34] मनश्शे वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

[35] मनश्शेच्या वंशात मोजलेले एकूण बत्तीस हजार दोनशे भरली.

[36] बन्यामीन वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

[37] बन्यामीन वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण पस्तीस हजार चारशे भरली.

[38] दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

[39] दानाच्या वंशातले मोजलेले एकूण बासष्ट हजार सातशे भरली.

[40] आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;

[41] आशेर वंशातील लोकांची जी मोजदाद झाली ती एकूण एकेचाळीस हजार पाचशे भरली.

[42] नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.

[43] नफतालीच्या वंशातील मोजलेले एकूण त्रेपन्न हजार चारशे भरली.

[44] मोशे, अहरोन आणि इस्राएलांच्या प्रत्येक घराण्यातील एक प्रमुख असे बारा नेते, ह्यानी ही मोजदाद केली.

[45] इस्राएली वंशातले वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून युद्धास लायक असलेल्या प्रत्येक पुरुषाची त्याच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे नोंद केली.

[46] ती मोजदाद एकूण सहा लाख तीन हजार पाचशे पन्नास भरली.

[47] इस्राएल लोकांबरोबर लेव्याची नोद त्यांच्या वडिलांच्या वंशावरून घेतली नव्हती.

[48] परमेश्वराने मोशेला सांगितले होते की,

[49] लेवी वंशाच्या दलातील लोकांची गणती करु नको किंवा इतर इस्राएल लोकांच्या गणतीत त्यांचा समावेश करु नको.

[50] लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी.

[51] जेव्हा निवासमंडप हलवावयाचा असेल तेव्हा तो लेवी लोकांनीच उतरावा व तो उभारताना लेवी लोकांनीच तो उभा करावा; त्याची निगा राखणे हे त्यांचेच काम आहे; कोणी परका जवळ आला तर त्यास जिवे मारावे.

[52] इस्राएल लोकांपैकी प्रत्येकाने आपापले तंबू आपापल्या दलाप्रमाणे आपापल्या छावणीत आपापल्या कुळाच्या निशाणाजवळ द्यावेत.

[53] परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.

[54] परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

गणना — Chapters