Listen to this chapter • 1:03
[1] त्या दिवशी तू म्हणशील, “हे परमेश्वरा, मी तुला धन्यवाद देतो यासाठी की तू माझ्यावर कोप केला होता, तो तुझा कोप निवळला आहे वर तू माझे सांत्वन केले आहे.
[2] पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”
[3] तुम्ही आनंदाने तारण कुपातून पाणी काढाल.
[4] त्या दिवशी तुम्ही म्हणाल, “परमेश्वरास धन्यवाद द्या व त्याच्या नावाचा धावा करा; लोकांमध्ये त्याची कृत्ये जाहीर करा; त्याचे नाम थोर आहे अशी घोषणा करा.
[5] परमेश्वरास गा, कारण त्याने गौरवी कृत्ये केली आहेत; हे सर्व पृथ्वीवर माहीत होवो.
[6] अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”
यशया — Chapters
15:4023:3933:5641:1955:5662:3874:1283:4094:06105:47113:02121:03133:31145:39151:50162:45172:49181:44194:35201:31213:14224:10233:35243:48252:41263:29272:41285:12294:45306:39312:10323:06334:02343:26351:47364:47377:03383:46391:49405:14415:34424:37435:00445:58455:16462:19473:02484:14495:27502:38515:04522:49532:45543:09552:25562:19573:46583:28593:58603:53612:28622:06633:38642:07654:59664:55