[1] नोहाच्या शेम, हाम व याफेथ या मुलांचे वंशज हे आहेत. पुरानंतर त्यांना मुले झाली.
[2] याफेथाचे पुत्र गोमर, मागोग, माद्य, यावान, तुबाल, मेशेख व तीरास हे होते.
[3] गोमरचे पुत्र आष्कनाज, रीफाथ व तोगार्मा हे होते.
[4] यावानाचे पुत्र अलीशा, तार्शीश, कित्तीम व दोदानीम हे होते.
[5] यांच्यापैकी समुद्र किनारपट्टीवरील लोक वेगळे झाले आणि आपापल्या भाषेनुसार, कुळानुसार त्यांनी देश वसवले.
[6] हामाचे पुत्र कूश, मिस्राईम, पूट व कनान होते.
[7] कूशाचे पुत्र सबा, हवीला, साब्ता, रामा, व साब्तका होते आणि रामाचे पुत्र शबा व ददान हे होते.
[8] कूशाने निम्रोदाला जन्म दिला, जो पृथ्वीवरचा पहिला जगजेत्ता बनला.
[9] तो परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी मनुष्य बनला. त्यामुळे “निम्रोदासारखा परमेश्वरापुढे पराक्रमी शिकारी” अशी म्हण पडली आहे.
[10] त्याच्या राज्याची पहिली मुख्य ठिकाणे शिनार देशातील बाबेल, एरक, अक्काद व कालने ही होती.
[11] त्या देशातून तो अश्शूर देशास गेला व तेथे त्याने निनवे, रहोबोथ, ईर, कालह ही शहरे बांधली
[12] आणि निनवे व कालह यांच्या दरम्यान त्याने रेसन नावाचे शहर वसवले. हे एक मोठे शहर आहे.
[13] मिस्राईम हा लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
[14] पात्रुसीम, कास्लूहीम (ज्यांच्यापासून पलिष्टी झाले), व कफतोरीम, ह्यांचा पिता बनला.
[15] कनान हा त्याचा प्रथम जन्मलेला मुलगा सीदोन आणि हेथ यांचा,
[16] तसेच यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
[17] हिव्वी, आर्की व शीनी
[18] अर्वादी, समारी व हमाथी यांचा पिता होता. त्यानंतर कनानाची कुळे सर्वत्र पसरली.
[19] कनान्यांची सीमा सीदोनापासून गराराकडे जाते त्या वाटेने गज्जा शहरापर्यंत होती. सदोम व गमोरा व तसेच अदमा व सबोयिम या शहरांकडे जाणाऱ्या वाटेवर लेशापर्यंत ती होती.
[20] कूळ, भाषा, देश व यांनुसार हे सर्व हाम याचे वंशज होते.
[21] शेम हा याफेथाचा वडील भाऊ होता. एबर हा शेम यांचा वंशज होता. तो सर्व एबर लोकांचा मूळ पुरुष होता.
[22] शेम याचे पुत्र एलाम, अश्शूर, अर्पक्षद, लूद व अराम हे होते.
[23] अरामाचे पुत्र ऊस, हूल, गेतेर, आणि मेशेख हे होते.
[24] अर्पक्षद हा शेलहचा पिता झाला, शेलह हा एबरचा पिता झाला.
[25] एबर याला दोन मुले झाली. एकाचे नाव पेलेग होते, कारण त्याच्या काळात पृथ्वीची विभागणी झाली; त्याच्या भावाचे नाव यक्तान होते.
[26] यक्तान अलमोदाद, शेलेफ, हसर्मावेथ, येरह
[27] हदोराम, ऊजाल, दिक्ला
[28] ओबाल, अबीमाएल, शबा,
[29] ओफीर, हवीला व योबाब यांचा पिता झाला. हे सर्व यक्तानाचे पुत्र होते.
[30] त्यांचा प्रदेश मेशापासून पूर्वेकडील डोंगराळ भागात, सेफर प्रदेशापर्यंत होता.
[31] आपआपली कुळे, आपापल्या भाषा, देश व राष्ट्रे यांप्रमाणे विभागणी झालेले हे शेमाचे पुत्र.
[32] पिढ्या व राष्ट्रे ह्यांनुसार ही नोहाच्या मुलांची कुळे आहेत. महापुरानंतर यांच्यापासून वेगवेगळी राष्ट्रे निर्माण होऊन पृथ्वीवर पसरली.