Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 9:41

[1] दुसऱ्या वेळेस शिमोनाच्या नावाची चिठ्ठी म्हणजे शिमोनाच्या वंशाची चिठ्ठी त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली; त्यांचे वतन तर यहूदाच्या वंशजाच्या वतनामध्ये त्यांना वतन मिळाले.

[2] आणि त्यांचे वतन म्हणून ही नगरे त्यांना मिळाली; बैर-शेबा म्हणजे शेबा व मोलादा;

[3] हसर-शुवाल व बाला व असेम;

[4] एल्तोलाद व बथूल व हर्मा;

[5] आणि सिकलाग व बेथ-मर्का-बोथ व हसर-सूसा;

[6] आणि बेथ-लबवोथ व शारुहेन; ही तेरा नगरे, आणि त्यांची गावे;

[7] अईन, रिम्मोन व एथेर व आशान; अशी नगरे चार, आणि त्याकडले गावे;

[8] बालथ-बैर, म्हणजेच दक्षिण प्रदेशातील रामा येथपर्यंत या नगरांच्या चहुकडली सर्व गावे. शिमोनी वंशजांचा त्यांच्या कुळांप्रमाणे हाच वतन भाग होय.

[9] शिमोनाला यहूदी वंशजाच्या वतनातील प्रदेशातच वाटा देण्यात आला. कारण यहूदी वंशाचे वतन त्यांच्या संख्येच्या मानाने फार मोठे होते, म्हणून त्यांच्या वतनात शिमोनी वंशजाला वतन मिळाले.

[10] तिसरी चिठ्ठी जबुलून वंशजाची त्यांच्या कुळाप्रमाणे निघाली; आणि त्यांच्या वतनाची सीमा सारीदपर्यंत आहे;

[11] त्यांची सीमा पश्चिमेस, वर मरलापर्यंत जाऊन दब्बेशेथ येथे पोहचते आणि यकनामा समोरील ओहोळास जाऊन लागते.

[12] ती सारीद येथून पूर्वेकडे सूर्याच्या उगवतीस वळून किसलोथ-ताबोर याच्या सीमेस लागते; तेथून दाबरथ येथे जाऊन याफीयपर्यंत वर जाते.

[13] तेथून पूर्वे दिशेकडे गथ-हेफेर व इत्ता-कासीन येथवर जाते. आणि तेथून नेया जवळील रिम्मोन येथे निघते;

[14] ती सीमा त्यास वळसा घालून उत्तरेस हन्नाथोनपर्यंत जाते व तेथून इफताह-एल खोऱ्यात संपते.

[15] कट्टाथ, नहलाल व शिम्रोन, इदला, बेथलहेम आदिकरून बारा नगरे दिली, त्यामध्ये गावे मोजली नाहीत.

[16] जबुलून वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.

[17] इस्साखाराच्या वंशजाची त्यांच्या कुळांप्रमाणे चौथी चिठ्ठी निघाली.

[18] त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल व कसुल्लोथ व शूनेम;

[19] आणि हफराईम, शियोन व अनाहराथ;

[20] रब्बीथ, किशोन व अबेस;

[21] रेमेथ व एन-गन्नीम, एन-हद्दा व बेथ-पसेस,

[22] त्याची सीमा ताबोर, शहसुमा व बेथ-शेमेश, येथवर जाते आणि त्यांच्या सीमेचा शेवट यार्देन येथे झाला; ही सोळा नगरे व त्यांची गावे.

[23] इस्साखाराच्या वंशाचे त्यांच्या कुळाप्रमाणे हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.

[24] पाचवी चिठ्ठी आशेर वंशजांच्या नावाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.

[25] त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती हेलकथ, हली, बटेन व अक्षाफ;

[26] अल्लामेलेख, अमाद व मिशाल, त्यांची सीमा पश्चिमेस कर्मेल व शिहोर-लिब्नाथ येथवर जाते;

[27] ती वळून सूर्याच्या उगवतीस बेथ-दागोन येथवर जाऊन उत्तरेस जबुलून वतनापर्यंत आणि इफताह-एल खोऱ्याच्या उत्तरेकडून व बेथ-एमेक नगर व नियेल नगर येथपर्यंत पोहचते, तशीच डावीकडे काबूल नगर येथे निघते.

[28] तेथून एब्रोन, रहोब व हम्मोन व काना यांवरून जाऊन मोठ्या सीदोन शहरापर्यंत पोहचते.

[29] तेथून ती वळसा घेऊन रामापर्यंत जाते व तेथून सोर नामक तटबंदीच्या नगरापर्यंत जाते. तेथून ती होसा नगराकडे वळते आणि अकजीब प्रदेशातून जाऊन समुद्राला मिळते.

[30] उम्मा, अफेक व रहोब, ही बावीस नगरे व त्यांची गावे त्यांना मिळाली;

[31] आशेराच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे, हेच वतन, ही नगरे व त्यांच्या आसपासची गावे हे होत.

[32] सहावी चिठ्ठी नफताली वंशजांच्या नांवाची त्यांच्या कुळांप्रमाणे निघाली.

[33] त्यांची सीमा हेलेफ नगर आणि साननीमातील एला वृक्ष यापासून अदामी-नेकेब शहर व यबनेल यावरुन लक्कुम येथे जाऊन यार्देनेपाशी निघते.

[34] तेथून ती सीमा पश्चिमेस वळून अजनोथ ताबोर येथे जाते व तेथून हुक्कोक शहर येथे जाते; व तेथून दक्षिणेस जबुलूनाच्या वतन भागापर्यंत आणि पश्चिमेस आशेराच्या वतनापर्यंत उगवतीस यार्देनेपाशी यहूदाच्या वतनभागाला जाऊन मिळते.

[35] त्यातील तटबंदीची नगरे हे, सिद्दीम, सेर, हम्मथ, रक्कथ व किन्नेरेथ;

[36] अदामा, राम व हासोर;

[37] केदेश, एद्रई व एन-हासोर;

[38] इरोन मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ व बेथ-शेमेश ही एकोणीस नगरे आणि त्यांची गावे.

[39] नफतालीच्या वंशचे त्याच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे.

[40] सातवी चिठ्ठी दान वंशजाच्या नावाची त्याच्या कुळांप्रमाणे निघाली.

[41] त्यांच्या वतन सीमेच्या आत ही नगरे होती; सरा, एष्टावोल, ईर-शेमेश.

[42] शालब्बीन व अयालोन व इथला;

[43] एलोन व तिम्ना, एक्रोन;

[44] एलतके, गिब्बथोन व बालाथ;

[45] यहूदा, बने-बराक व गथ-रिम्मोन.

[46] मीयार्कोन व रक्कोन, याफोच्या समोरील प्रदेश.

[47] दानाच्या वंशजाची सीमा त्यांच्या मूळ वतनाबाहेरही गेली, कारण की दान वंशजांनी लेशेम शहराशी लढून त्यास धरले; आणि तलवारीने त्यास मारल्यावर त्यांचा ताबा घेऊन त्यामध्ये वस्ती केली, आणि आपला पूर्वज दान याचे नाव त्यांनी लेशेम शहरास ठेवले.

[48] दानाच्या वंशाचे त्यांच्या कुळांप्रमाणे हेच वतन, ही नगरे आणि त्यांची गावे मिळाली ते हे.

[49] इस्राएल लोकांनी देशाच्या सीमांप्रमाणे वतन करून घेण्याची समाप्ती केल्यावर नूनाचा पुत्र यहोशवा याला आपल्यांमध्ये वतन दिले.

[50] परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी एफ्राइम डोंगरावरचे तिम्नाथ-सेरह नगर, जे त्याने मागितले, मग तो ते नगर बांधून त्यामध्ये राहिला.

[51] एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएलाच्या वंशांतले वडील अधिकारी यांनी शिलोमध्ये दर्शनमंडपाच्या दारी परमेश्वरासमोर, चिठ्ठ्या टाकून जी वतने वाटून दिली ती ही; याप्रमाणे त्यांनी देश वाटून देण्याचे संपले.

यहोशवा — Chapters