Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 10:58

[1] यहूदी वंशाला त्याच्या कुळाप्रमाणे नेमून दिलेला जो भाग चिठ्ठ्या टाकून मिळाला तो अदोमाच्या सीमेपर्यंत आणि दक्षिणकडे सीन रानापर्यंत अगदी दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला आहे.

[2] आणि त्यांची दक्षिण सीमा क्षारसमुद्राच्या शेवटची खाडी, जिचे तोंड दक्षिणेस आहे, तेथून झाली.

[3] ती तशीच अक्रब्बीम नावाच्या चढणीच्या दक्षिणेकडे जाऊन सीन रानाच्या कडेने कादेश-बर्ण्याच्या दक्षिणेस गेली असून हेस्रोन नगराजवळून अद्दारा नगरावरून जाऊन कर्का नगराकडे वळली आहे.

[4] आणि ती असमोना जवळून मिसरी नदीस गेली; नंतर तिचा शेवट पश्चिम समुद्रा नजीक आहे; अशी तुमची दक्षिण सीमा व्हावी.

[5] आणि पूर्व सीमा क्षार समुद्रावरून यार्देनेच्या मुखापर्यंत आहे; आणि उत्तरेस कोपऱ्याची सीमा समुद्राच्या काठी यार्देनेचा मुखाजवळील समुद्राची खाडी तेथून आहे.

[6] मग ती सीमा बेथ-होग्ला नगराच्या चढावावरून जाऊन बेथ-अराबा नगराच्या उत्तरेस जाते; नंतर ती सीमा रऊबेनाचा पुत्र बोहन याची धोंड तेथवर चढून गेली;

[7] मग ती सीमा अखोरच्या खोऱ्यापासून दबीरापर्यंत जाऊन उत्तरेस गिलगालकडे वळली आहे; हे गिलगाल नदीच्या दक्षिणेस अदुम्मीमाच्या चढणीसमोर आहे, ती नदी दक्षिणेस आहे; नंतर ती सीमा एन-शेमेशाच्या नावाच्या झऱ्याजवळून जाऊन तिचा शेवट एन-रोगेलास होतो.

[8] मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीजवळून यबूसी म्हणजे यरूशलेम त्याच्या दक्षिण भागास चढून जाते; नंतर पश्चिमेस हिन्नोम खिंडीच्या समोर जो डोंगर, जो रेफाईमांच्या उत्तरेस आहे, खोऱ्याच्या शेवटी शिखरावर सीमा चढून गेली.

[9] मग डोंगराच्या शिखरापासून नेफ्तोहाच्या पाण्याच्या झऱ्यापर्यंत सीमा पुढे गेली; आणि एफ्रोन डोंगरावरच्या नगरात जाऊन, बाला म्हणजेच किर्याथ-यारीम तिकडे ती सीमा पुढे गेली,

[10] मग बालापासून ती सीमा पश्चिमेस सेईर डोंगराकडे फिरून यारीम डोंगर, म्हणजेच कसालोन त्याच्या उत्तरेकडल्या भागा जवळून गेली, आणि बेथ-शेमेशाकडे उतरून तिम्ना शहराकडे गेली.

[11] मग ती सीमा एक्रोन शहराच्या बाजूस उत्तरेकडे गेली, आणि शिक्रोन नगरापर्यंत सीमा गेली आहे; मग बाला डोंगराजवळून जाऊन यबनेल नगरास गेली; या सीमेचा शेवट समुद्रात होता.

[12] आणि पश्चिमेची सरहद्द महासमुद्रचा किनारा हीच सीमा होती, ही चहुकडली सीमा यहूदाच्या वंशास त्यांच्या कुळाप्रमाणे जो विभाग मिळाला त्याची होती.

[13] आणि परमेश्वराने यहोशवास सांगितल्यानुसार यहोशवाने यफुन्नेचा पुत्र कालेब याला यहूदाच्या वंशाबरोबर वाटा दिला, त्याने किर्याथ-आर्बा, म्हणजेच हेब्रोन शहर हे त्यास दिले; हा आर्बा अनाक्यांचा पूर्वज होता.

[14] मग तेथून कालेबाने अनाकाची तीन मुले शेशय व अहीमान व तलमय म्हणजे अनाकाचे वंशज यांना वतनातून घालवले.

[15] नंतर तो तेथून दबीर शहरात राहणाऱ्यांवर चालून गेला; दबीराचे पूर्वीचे नाव किर्याथ-सेफर होते.

[16] तेव्हा कालेब म्हणाला, “जो किर्याथ-सेफर लढून काबीज करून घेईल, त्यास मी आपली कन्या अखसा पत्नी करून देईन.

[17] तेव्हा कालेबाचा भाऊ कनाज याचा पुत्र अथनिएल याने ते काबीज केले; यास्तव त्याने आपली कन्या अखसा त्यास पत्नी करून दिली.”

[18] आणि ती त्याच्याकडे आली तेव्हा असे झाले की तिने आपल्या बापाजवळ शेत मागायला त्यास गळ घातली, आणि ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला म्हटले, तुला काय पाहिजे?

[19] अखसाने उत्तर दिले, “मला आशीर्वाद द्या; कारण तुम्ही मला नेगेब दिले आहे तर मला पाण्याचे झरेही द्या.” त्याने तिला वरचे झरे व खालचे झरे दिले.

[20] यहूदाच्या वंशाचे वतन त्यांच्या कुळाप्रमाणे हेच आहे;

[21] यहूदाच्या वंशजांना दक्षिणेस अदोमाच्या सीमेजवळील नगरे मिळाली ती ही; कबसेल व एदेर व यागूर;

[22] कीना व दीमोना व अदादा;

[23] आणि केदेश व हासोर व इथनान;

[24] जीफ, टेलेम व बालोथ;

[25] हासोर-हदत्ता व करीयोथ हस्रोन (यालाच हासोरसुद्धा म्हणत)

[26] अमाम व शमा व मोलादा;

[27] आणि हसर-गदा व हेष्मोन व बेथ-पेलेट;

[28] आणि हसर-शुवाल व बैर-शेबा व बिजोथा;

[29] बाला, ईयीम व असेम;

[30] आणि एल्तोलाद व कसील व हर्मा;

[31] आणि सिकलाग व मद्मन्ना व सन्सन्ना;

[32] आणि लबावोथ, शिलहीम, अईन व रिम्मोन; ही सर्व नगरे एकोणतीस त्यांची गावे.

[33] तळवटीतली नगरे ही, एष्टावोल, सरा व अषणा;

[34] जानोहा व एन-गन्नीम तप्पूहा व एनाम;

[35] यर्मूथ व अदुल्लाम, सोखो व अजेका;

[36] आणि शाराईम व अदीथईम व गदेरा व गदेरोथईम, अशी चौदा नगरे, आणि त्यांची गावे;

[37] सनान व हदाशा व मिग्दल-गाद;

[38] दिलन, मिस्पा व यकथेल;

[39] लाखीश व बसकाथ व एग्लोन;

[40] कब्बोन व लहमाम व किथलीश;

[41] गदेरोथ बेथ-दागोन व नामा व मक्केदा; अशी सोळा नगरे, आणि त्यांची गावे.

[42] लिब्ना व एथेर व आशान;

[43] इफ्ताह व अष्णा व नजीब;

[44] आणि कईला व अकजीब व मारेशा; अशी नऊ नगरे, आणि त्यांची गावे.

[45] एक्रोन आणि त्याच्या उपनगरांसह त्याची गावे;

[46] एक्रोनाजवळची आणि पश्चिमेची अश्दोदाची बाजूकडली सर्व वसाहत, त्याच्याजवळच्या खेडेगावांसह.

[47] अश्दोद, त्याच्या सभोवतीची उपनगरे व खेडी; गज्जा, त्याच्या सभोवतीची उपनगरे आणि खेडी; मिसराचा ओहोळ व महासमुद्राच्या किनाऱ्यावरची नगरे.

[48] आणि डोंगराळ प्रदेशातली नगरे ही, शामीर व यत्तीर व सोखो;

[49] दन्ना व किर्याथ-सन्ना तेच दबीर;

[50] अनाब व एष्टमो व अनीम,

[51] आणि गोशेन व होलोन व गिलो. अशी अकरा नगरे, आणि त्याकडील खेडी,

[52] अरब व दूमा व एशान,

[53] यानीम व बेथ-तप्पूहा व अफेका,

[54] हुमटा व किर्याथ-आर्बा तेच हेब्रोन व सियोर, अशी नऊ नगरे, आणि त्यांची खेडी.

[55] मावोन, कर्मेल व जीफ व यूटा,

[56] इज्रेल व यकदाम व जानोहा,

[57] काइन, गिबा, व तिम्ना, ही दहा नगरे आणि त्यांची खेडी.

[58] हल्हूल, बेथ-सूर व गदोर,

[59] माराथ, बेथ-अनोथ व एल्तकोन; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.

[60] किर्याथ-बाल म्हणजेच किर्याथ-यारीम व राब्बा ही दोन नगरे आणि त्यांची खेडी.

[61] रानातली नगरे ही, बेथ-अराबा, मिद्दीन व सखाखा;

[62] आणि निबशान व मिठाचे नगर व एन-गेदी; ही सहा नगरे आणि त्यांची खेडी.

[63] तथापि यरूशलेमात राहणाऱ्या यबूसी लोकांस यहूदाच्या वंशजाना घालवता आले नाही; यास्तव यबूसी यरूशलेमात यहूदाच्या वंशजाजवळ आजपर्यंत राहत आहेत.

यहोशवा — Chapters