13 November 2026
व्यवसायापलीकडचे भावबंध: गुलाबराव सपकाळ यांच्या जीवनावरील विशेष आठवणी | अभिवाचन Granthpremi
ग्रंथप्रेमी - Granthpremi
About
साहित्याचा खप आणि व्यापारी नफा या पलीकडे जाऊन केवळ 'गुणवत्ता' जपणारा प्रकाशक आजच्या काळात शोधून सापडेल का? 'ग्रंथप्रेमी'च्या आजच्या विशेष भागात लेखक श्री काका विधाते यांनी प्रफुल्लता प्रकाशनाचे संस्थापक श्री. गुलाबराव सपकाळ यांच्या पंचाहत्तरीनिमित्त लिहिलेल्या हृदयस्पर्शी आठवणींचे अभिवाचन, आधारवड या पुस्तकातून पौर्णिमा देशपांडे यांनी सादर केले आहे. संघर्षातून घडलेले व्यक्तिमत्त्व, ४० वर्षांची निष्ठावंत ज्ञानसेवा, संशोधनासाठी खंबीर पाठबळ देणे, व्यवसायापलीकडचे भावबंध, ग्रंथनिष्ठा व औदार्य असे बहुमूल्य गुण आपल्याला सरांमध्ये पहायला मिळतात त्यांची ही सुरस कहाणी नक्की ऐका.