राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history
26 June 2026

राजाराम महाराजांना आश्रय देऊन औरंगजेबाला आव्हान देणारी वीरांगणा | बेदनूरची राणी चेन्नम्मा | #history

ग्रंथप्रेमी - Granthpremi

About
इतिहासाने जिच्या शौर्याची दखल घेतली, पण आपण मात्र विसरलो — ती केळदी-बेदनूरची राणी चेन्नम्मा. नि. मेजर मोहिनी गर्गे कुलकर्णी लिखित "अपराजिता — गाथा भारतीय वीरांगणांची" या ग्रंथातून Granthpremi अभिवाचनात आज तिची अविश्वसनीय गाथा जिवंत होतेय!
या भागात आपण राणी चेन्नम्मा यांचा इतिहास पाहणार आहोत, जो आजच्या पिढीला व्यवस्थापन, शौर्य आणि धैर्याचे मोठे धडे देतो. काय पाहाल या व्हिडिओमध्ये :
• साध्या व्यापारी कुटुंबातील मुलगी केळदीची सम्राज्ञी कशी झाली?
• राजघराण्यात जन्म न घेताही शस्त्रविद्या, मुत्सद्देगिरी आणि प्रशासनात मिळवलेले प्राविण्य.
• फितूर नातेवाईक आणि शेजारील डच-पोर्तुगीज आक्रमकांचे डावपेच कसे उधळले?
• एका सामान्य मुलाला दत्तक घेऊन त्याला आदर्श राजा बनवण्याचे दूरदर्शी प्रशिक्षण.
• छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी चेन्नम्मा यांच्यातील तो गुप्त मैत्रीचा तह.
• मुघल फौजेला दलदलीत आणि डोंगरदऱ्यात चिरडून टाकणारी राणीची गनिमी कावा युद्धपद्धती.
हा केवळ इतिहास नाही, तर संकटात कसं खंबीर राहायचं याचं जिवंत उदाहरण आहे.