म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi
05 December 2025

म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi

ग्रंथप्रेमी - Granthpremi

About
सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा संवाद या दुसर्‍या भागातही आपण चालू ठेवतोय.
डॉ. शिंदे सांगतात की संत साहित्य म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर ते जगण्याचं बळ देणारं सत्व आहे. नरोटीची उपासना करण्यापेक्षा त्यातील खोबरं (तत्वज्ञान) जास्त महत्त्वाचं आहे. मुक्ताबाई, जनाबाई आणि बहिणाबाई या केवळ संतांच्या रांगेतल्या मूर्ती नाहीत, तर त्या आधुनिक स्त्रीच्या मनाचा 'आरसा' आहेत. या आरशात पाहताना आपल्याला कुठलाही मेक-अप किंवा मुखवटा लागत नाही. 'मुंगी उडाली आकाशी' सारख्या कूट रचनांमागे मागे दडलेला गूढ अर्थ आणि मुक्ताईंचे 'आदिमाया' रूप उलगडून दाखवणारा हा विशेष भाग जरूर पहा.
एपिसोडमधील महत्वाचे मुद्दे:
ताटीचे अभंग: स्वतःच लावलेली ताटी आधुनिक स्त्रीने किंवा पुरुषांनी कशी उघडायची ?
वसंत बापट ते बहिणाबाई या वेगवेगळ्या काळातील कवींनी मुक्ताईच्या 'योग सामर्थ्याला' कसे शब्दबद्ध केले आहे?
मुक्ताबाईंचे वारकरी संप्रदायासाठी योगदान काय आहे? ग्रेस यांच्या कवितेत आणि मुक्ताईच्या अभंगात काय साम्य आहे? प्रज्ञा दया पवार आणि सरिता पत्की यांच्या कवितांतून मुक्ताई कशी भेटते?
जगण्याचे भान: एआय AI च्या युगात संत साहित्याचे 'गुगल मॅप' आपल्याला कसे दिशा देऊ शकते?
लेखिकेचा प्रवास: आकाशवाणीच्या लेखनापासून ते संत साहित्याच्या गाभ्यापर्यंतचा डॉ. रूपाली शिंदेंचा रंजक प्रवास.


डॉ. रूपाली शिंदे यांनी लिहिलेली पुस्तके ग्रंथप्रेमी वेबसाइट वरुन घरपोच मागवण्यासाठी खालील लिंक वापरा :-
https://granthpremi.com/collections/dr-rupali-shinde