Skip to content
Opens in a new window
Listen to this chapter • 2:29

[1] यरूशलेमेतील लोकहो, आता युध्दामध्ये एकत्र या. तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील.

[2] पण हे, बेथलहेम एफ्राथा. जरी तू यहूदातील सर्व कुळांत सर्वात लहान आहेस. तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलात अधिकारी व्हायला एकजण निघेल. त्याचा प्रारंभ पुरातन काळापासून, प्राचीन काळापासून आहे.

[3] यास्तव प्रसूतीवेदना पावणारी प्रसवेपर्यंत तो त्यांना सोडून देईल, आणि मग त्याचे उरलेले भाऊ इस्राएलाच्या लोकांकडे परत येतील.

[4] तो उभा राहून परमेश्वराच्या सामर्थ्याने, परमेश्वर त्याचा देव याच्या नावाच्या प्रतापाने, आपला कळप चारील, आणि ते वस्ती करतील; कारण आता तो पृथ्वीच्या शेवटापर्यंत महान होत जाईल.

[5] आणि तो पुरुष आंम्हास शांती असा होईल. अश्शूर जेव्हा आमच्या देशात येईल व ते आमच्या राजवाड्यात चालतील, तेव्हा आम्ही सात मेंढपाळ आणि आठ मुख्य त्याच्याविरुध्द उभे राहू.

[6] तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील. तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन.

[7] जसे परमेश्वराकडून दहिवर येते, जशा गवतावर सरी येतात आणि त्या मनुष्याची वाट पाहत नाही व मनुष्याच्या मुलाची वाट पाहत नाही, तसे याकोबचे उरलेले लोक पुष्कळ लोकांच्यामध्ये होतील.

[8] जसा जंगलातील प्राण्यांमधील सिंह येतो, जसा तरूण सिंह मेंढ्यांच्या कळपांत येतो, आणि तो मेंढ्यांच्या कळपातून गेला तर त्यांना तुडवितो व चिरडून टाकतो व त्यांना वाचवायला कोणी नसते, त्याच प्रकारे याकोबाचे राहीलेले लोक, पुष्कळ लोकांच्यामध्ये असतील.

[9] तुझा हात तू शत्रूंवर उंचावलेला होवो आणि तो त्यांचा नाश करो.

[10] परमेश्वर असे म्हणतो, “त्या दिवसात असे होईल की, मी तुझे घोडे तुझ्यामध्ये नष्ट करीन आणि तुमचे रथ मोडून टाकीन.

[11] तुझ्या देशातील गावांचा मी नाश करीन आणि तुझे सर्व किल्ले पाडून टाकीन.

[12] तुझ्या हातून मी जादूटोणा नष्ट करीन, आणि तुमच्यात यापुढे भविष्य सांगणारे नसतील.

[13] मी तुझ्या कोरीव मूर्तींचा आणि दगडी स्तंभांचा नाश करीन. तुमच्या हातांनी घडविलेल्या वस्तूंची तुम्ही पूजा करणार नाही.

[14] तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन, आणि तुझ्या शहरांचा नाश करीन.

[15] आणि ज्या राष्ट्रांनी माझे ऐकले नाही त्यांचा मी क्रोधाने व कोपाने प्रतिकार करीन.”

मीखा — Chapters