

Thru the Bible Marathi
थू्र द बायबल - ttb.twr.org/marathi
मराठी भाषेतील उपासना हा कार्यक्रम संपूर्ण जगभर पवित्र शास्त्राचे च्चिक्षण देणारी सेवा ''थ्रू द बायबल'' हयाचा भाग आहे. डॉ. जे वर्णन मॅक्गी हयांनी ही श्रृखंला रचली व आता शंभरहून अधिक बोली भाषेमध्ये तीचे भाषांतर करण्यात आले आहे. हा तीस मिनिटांचा नियोजित रेडिओ कार्यक्रम आहे, जो श्रोत्यांना सुनियोजीतपणे संपूर्ण पवित्र शास्त्राचा आभ्यास करण्यास मदत करतो. हे कार्यक्रम आता इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. हा कार्यक्रम ऐकून आपण पवित्र शास्त्राबद्दल च्चीकण्यास सुरवात केली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आपण सोमवार ते शुक्रवार कमीत कमी एक कार्यक्रम ऐकावा असा सल्ला आम्ही आपणांस देतो. पुढील पाच वर्षे जर आपण दर आठवडी नियमितपणे असे केले तर आपला संपूर्ण पवित्र शास्त्राचा अभ्यास पूर्ण होईल.