Opens in a new window
सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book
04 March 2026

सुमन कल्याणपूर: सात्विक सुरांचा नंदादीप | Suman Kalyanpur | New Marathi Book

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

About
स्त्रीत्व कसं असेल, तिच्या अलवार मनाला काय भावत असेल, तिचं हळुवार व्यक्त होणं कसं असेल, तर सुमनताईंसारखं..! प्रेमळ, समजूतदार, हळवं, शांत, समर्पित... शांतपणे तेवणारा नंदादीपच जणू. कोवळ्या नाजूक फुलांचा मंद सुगंध, पावसाची हलकीशी सर, झाडाची कोवळी पालवी, पानांवरील निर्मळ दवबिंदू किती उपमा द्याव्यात या आवाजाच्या व्यक्तिमत्त्वाला? त्यानं आपलं असं एक स्थान निर्माण केलं. पौर्णिमेच्या शीतल चांदण्याला जर स्वतःचा आवाज मिळाला तर किती मधुर असेल तो? तरल, सुरेल, वत्सल, शुद्ध उच्चारांचं लेणं लाभलेला, उत्तम पल्ला नि फिरत असणारा, तरी अत्यंत भावपूर्ण... सुमन कल्याणपूर यांच्या मराठी व हिंदी गाण्यातल्या सांगीतिक वैशिष्ट्यांचा स्मरणीय आढावा आणि त्यांच्या निकोप आवाजातल्या निवडक २५ गाण्यांचं रसग्रहण, प्रसिद्ध गायिका अपर्णा संत यांच्या आवाजात...

Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/suman-kalyanpur-samana-kalyanaepara

Book: Suman Kalyanpur
Author: Aparna Sant
Podcast Host: Shirish Sahasrabuddhe
Signature Tune: Gandhaar Sangoram
Cover Design: Veerendra Tikhe
Executive Producer: Mohini Medhekar

Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune

#marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices