Opens in a new window
नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati
24 December 2025

नाट्यभारती: ७० वर्षांचा अनोखा प्रवास | Rajhans Prakashan | Natyabharati

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

About
नाटक म्हणजे अल्प रंगमंचसज्जा, सशक्त कथानक अन् सामर्थ्यवान भावदर्शी अभिनय यांच्या बळावर प्रेक्षकांना स्वतःचा, आसपासचा आणि व्यापक समाजाचा गंभीर विचार करायला लावणारं एक महत्त्वाचं माध्यम आहे, हे या नाट्यसंस्थेनं आपल्या नाट्यकार्यातून दाखवून दिलं. बृहन्महाराष्ट्रातील मराठी जनांची नाळ आजही मराठी भाषा आणि महाराष्ट्रीय संस्कृतीशी जोडलेली आहे, ही गोष्ट अधोरेखित करणारा इंदौरच्या रंगकर्मीचा सात दशकांचा सर्जन प्रयोग 'नाट्यभारती'. सुनीता लोहोकरे लिखित नाट्यभारती हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने नुकतेच प्रकाशित केलं आहे. यानिमित्तानं या सुनीता लोहोकरे यांनी ज्येष्ठ रंगकर्मी श्रीराम जोग यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद.
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices