Opens in a new window
Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration
25 February 2026

Done That Been There | Meghana Pethe | Marathi Book Narration

राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor

About
Book Link: https://www.rajhansprakashan.com/product-details/done-that-been-there-da-thata-bthaara

हे भुयार आहे की विवर हे समजत नाही. आणि दिवा दाखवायला कुणी नाही. आठवणींच्या गच्च रानात हरवल्यावर हाक द्यायला कुणी नाही. मडक्यांची पुन्हा माती होताना कुणीच सोबत नाही. आणि या वाहत्या नदीच्या पाण्याचा ठाव घेता येत नाही. हे नीट उमगल्यावर माणूस स्वतःशी बोलू लागतो का ? आणि हे असं स्वतःशी बोलणंच असतं का लिहिणं वगैरे ? लिहिणाऱ्या समोर ठाकणारे असे अनेक प्रश्न.. ज्यांची उत्तरं लिहिणाऱ्याला लिहिता लिहिताच उमगत जातात. दुसरे आपल्याला समजतात, तितके मूर्ख आपण खचितच नसतो. पण आपण स्वतःला समजतो, तितके शहाणेही आपण क्वचितच असतो! लिहिताना आणि लिहिल्यावर काय काय झालं, यातली तथ्यं मी मांडताना हे शक्य आहे, की 'या तथ्यांच्या जबड्यातून निसटून, सत्य कदाचित् दूर कुठेतरी एकटंच बागडत असेल!'...डंदॅट् बींदेअर् या आपल्या नवीन पुस्तकातील काही निवडक भाग सादर करताहेत लेखिका मेघना पेठे

Book - Done That Been There
Author and Publisher - Meghana Pethe
Distributor - Rajhans Prakashan
Recording - AK Studio
Executive Producer: Niranjan Medhekar

Produced By: Rajhans Prakashan, Pune
Production and Distribution: SoundsGreat NM Audio Solutions LLP. Pune

#marathipodcast #rajhansimohor #rajhansprakashan #rajubaviskar
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices