एखाद्या व्यक्तीला किती personal होऊ द्यावं?
Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast
काही लोकांशी आपण पहिल्याच भेटीत खूप comfortable होतो…दोन-चारगप्पा होतात आणि अचानक आपल्याला वाटतं -“अरे, या व्यक्तीशी इतकं मोकळेपणाने बोलता येतंय!” आणि मग नकळत आपण आपल्या आयुष्यातल्या खूप personal गोष्टी share करायला लागतो. आपल्या घरात काय चाललंय… आपल्या नात्यांमध्ये काय problem आहेत… आपल्याला कशाची भीती वाटते… कधी कधी तर अशा गोष्टीही सांगतो ज्या कदाचित त्या व्यक्तीला सांगायची आपली अजून वेळच आलेली नसते. पण दुसरीकडे काही लोक असेही असतात की, कितीही वर्षांची ओळख असली तरी आपण त्यांच्यासमोर पूर्णपणे उघडत नाही.मग प्रश्न असा- एखाद्या व्यक्तीला आपण किती personal होऊ द्यावं? आणि त्याहून महत्त्वाचं… आपण कोणासमोर किती personal व्हावं?
You can follow me:
LinkedIn: alpana-deo
Instagram: alpanabapat
Facebook: Mothers Gurukul & alpana.deo
Youtube: Mother's Gurukul
Blog: Mothers Gurukul