Skip to content
Opens in a new window
# 2168 : "दिवाळीतला किल्ला करण्याचे कुठे गेले ते दिवस?'  लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. (प्रा सौ. अनुराधा भडसावळे. )
01 November 2026

# 2168 : "दिवाळीतला किल्ला करण्याचे कुठे गेले ते दिवस?' लेखिका : नीता चंद्रकांत कुलकर्णी. (प्रा सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

पेपर संपले, सुट्टी लागली आणि सोसायटीतली पोरं खाली जमली... यंदा ठरलं – पन्हाळगडच बांधायचा! पण विटा आणायच्या कुठून? बुरुजावरून झालेली भांडणं, चोरून आणलेल्या विटा आणि त्यावरून रडकुंडीला आलेली दोन पोरं... हा किल्ला पूर्ण होतो की नाही? 

आणि हे सगळं बघताना आठवतो आपला लहानपणीचा गड –  तेंव्हा दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत ती वाढत जायची. किल्ल्याची ती गारूची माती, सलाईनचं कारंजं;

 गल्ला फोडून आणलेले फटाके आणि बंबाच्या पाण्याचा तो धुराचा वास... चला तर, आजच्या पोरांचा किल्ला आणि आपल्या आठवणीतला गड – दोन्ही एकाच दमात ऐकूया!

===============