About
Send us Fan Mail
लोकलच्या मोटरमनला रोज गाडी चालवताना काय काय पाहावं लागतं?
फुटओव्हर ब्रिज असतानाही रुळ ओलांडणारे प्रवासी, कानात हेडफोन घालून रेल्वे ट्रॅकवरून जाणारे लोक आणि क्षणभराच्या निष्काळजीपणामुळे घडणारे जीवघेणे अपघात!
मोटरमन वारंवार हॉर्न वाजवतो, पण काही जण त्याकडेही दुर्लक्ष करतात. त्याच्या डोळ्यांसमोर एखादा भयानक अपघात घडतो, मन हादरतं, काळीज थरारतं; पण गाडी थांबवून त्या धक्क्यातून सावरण्याची संधी त्याला मिळत नाही.
त्याला सिग्नल चुकवून चालणार नसतं , रुळांवरचं लक्ष हटवायचं नसतं. मनाला बसलेला आघात गिळून त्याला पुन्हा कर्तव्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं.