26 October 2026
# 2165 : 'आणि देवही निरूत्तर झाला!‘ लेखक : मुकेश माचकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
तीन जिवलग मित्र प्रवासाला निघाले आणि एका विचित्र अपघातात तिघांचंही आयुष्यच बदलून गेलं. एकाचे पाय गेले, दुसऱ्याचे हात, तर तिसऱ्याची दृष्टी!
गमावलेले अवयव परत मिळावेत म्हणून तिघांनी देवाचा धावा केला आणि देवही लगेच हजर झाला. पण त्याने तिघांनाही त्यांच्या वागण्यातले दोष दाखवून दिले आणि विचारलं,
“तुमच्या मनातली माणुसकी अपंग झाली होती, तेव्हा माझी आठवण का झाली नाही?” या प्रश्नाचं उत्तर दिलंत, तर तुम्हाला पुन्हा पूर्वीसारखं करीन!
त्यावर तिघांनी असं काही उत्तर दिलं, की देवाला आपला शब्द पाळावाच लागला! काय होतं ते उत्तर? ऐका ही अनोखी गोष्ट!