23 October 2026
# 2163 : ‘समर्थशिष्य कल्याणाची जेव्हा मारुती राय परीक्षा घेतात!‘ (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
कल्याणाने गड उतरायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य! त्याचे शरीर पिसासारखं हलकं झालं. काही कळायच्या आतच तो उरमोडी नदीच्या पात्राजवळ पोहोचला. आश्चर्याने मागे वळून पाहिलं, तर तेच वृद्ध साधक समोर उभे होते!
“आपण इतक्या लवकर खाली कधी उतरलात? माझ्या हातून काही चूक तर घडली नाही ना?”
वृद्ध हसले आणि त्यांनी कल्याणाच्या डोक्यावर हात ठेवला. क्षणार्धात समोर साक्षात मारुतीराय प्रकट झाले!
मारुतीरायांचं विराट रूप पाहून कल्याणाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याने त्यांच्या चरणांवर लोटांगण घातलं.
हनुमंत म्हणाले, “बाळा, तुझ्या भक्तीने आणि सद्गुरूंवरील प्रेमाने मी प्रसन्न झालो. असाच सद्गुरूंची सेवा करत राहा. आज तू पूर्ण झालास!”
आणि क्षणार्धात तेजाचा प्रचंड लोळ आकाशात विलीन झाला.
=========