About
Send us Fan Mail
घरातला पसारा आवरता आवरता वैतागलेली तरुण आई मावशीला म्हणाली, “मावशी, अगं काय सांगू तुला! घरभर कायम खेळणी पसरलेली असतात. चालताना उड्या मारत वाट काढावी लागते. किती वेळा आवरायचं गं हे सगळं?”
मावशी हसली आणि म्हणाली, “अगं, एक गोष्ट लक्षात ठेव. प्रत्येक घराचंही एक वय असतं! लहान मुलं घरात असली की पसारा होणारचं . … !
बयो, लक्षात ठेव, घराचं हे वय पुन्हा येत नाही गं. पिल्लं घरात आहेत तोवरच हा गोंधळ आणि त्यातली मजा अनुभवून घ्यायची. पुढे मुलं मोठी होतील, आपापल्या वाटेनं निघून जातील… मग आहेच की आपलं शांत, स्वच्छ आणि नीटनेटकं घर!