Skip to content
Opens in a new window
# 2128 : ‘सूर्यफूल सूर्याचा पाठलाग का करते‘? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
09 September 2026

# 2128 : ‘सूर्यफूल सूर्याचा पाठलाग का करते‘? (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

सकाळी सूर्य पूर्वेला उगवतो, तेव्हा सूर्यफूलही पूर्वेकडे तोंड करून उभं असतं. दिवसभर सूर्य आकाशातून पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जातो… आणि त्याच्याबरोबर हे फूलही हळूहळू आपली दिशा बदलतं. संध्याकाळी ते पश्चिमेकडे वळलेलं दिसतं. पण गंमत अशी की, दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याआधीच ते पुन्हा पूर्वेकडे तोंड करून तयार असतं!

हे फूल असं का करतं? सूर्याचा पाठलाग करण्यासाठी त्याला दिशा कोण सांगतं? आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे—रात्रीच्या अंधारात सूर्य नसतानाही ते सकाळची दिशा ओळखतं तरी कसं?