About
Send us Fan Mail
श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहेच. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे म्हणजेच जरा-जिवंतिका पूजन केले जाते. श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या पूजनासह वरदलक्ष्मीचेही व्रत केले जाते. तर आज हे वरदलक्ष्मी व्रत जाणून घेऊया.