Skip to content
Opens in a new window
# 2097 : उलटे लटकण्याची शिक्षा.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
08 August 2026

# 2097 : उलटे लटकण्याची शिक्षा.. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

स्वर्गातून पृथ्वीकडे पाहताना एकादशी देवीच्या मनात एक वेगळाच संघर्ष सुरू होता. संपूर्ण जगात तिचे भक्त अन्नाचा एक कणही न खाता, स्वतःला कष्ट देऊन तिचे कडक व्रत पाळत होते. पण तिची नजर जेव्हा पुरीच्या श्रीक्षेत्र धामावर पडली, तेव्हा तिथे तिला वेगळेच दृश्य दिसले. तिथे उपवासाची कोणतीही सक्ती नव्हती, तर आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. "माझे एवढे कडक व्रत सगळे जग पाळते, मग पुरीचे लोक असे काय वेगळे करतात की ते माझे नियम मोडत आहेत?" या विचाराने देवीच्या मनात थोडासा अहंकार आणि राग जागा झाला.