Opens in a new window
# 2065 : येरे घना येरे घना.   (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
23 June 2026

# 2065 : येरे घना येरे घना. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

आरती प्रभूंच्या कवितांत शब्द नाही , तर भावनांचे झरे वाहत असत. स्वानंदासाठी कविता करणाऱ्या त्या कवीच्या मनातून एके दिवशी काही ओळी सहज उमटल्या—

"नको नको म्हणतांना, गंध गेला राना वना...
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना..."

हृदयनाथ मंगेशकर वारंवार म्हणत, "ही कविता पूर्ण करा." पण आरती प्रभू प्रत्येक वेळी ते हसत हसत टाळत. अखेर एक दिवस शब्दांचा जणू बांधच फुटला आणि कविता पूर्ण झाली.

पुढे हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुरांनी आणि आशा भोसले यांच्या स्वरांनी "ये रे घना, ये रे घना" अजरामर झालं. आजही हे गीत कानावर पडलं की पावसाचा सुगंध, मनाचा मोर आणि निसर्गाचा उत्सव एकाच वेळी जागा होतो.