
22 June 2026
# 2064 : "सेकंड हॅन्डचं दुःख". लेखक कौस्तुभ केळकर. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
About
Send us Fan Mail
तिच्या नवऱ्याला एकच मोठा भाऊ. अभ्यासात हुशार, कायम पहिला नंबर आणि आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणारा.
धाकट्याच्या वाट्याला मात्र कायम मोठ्या भावाच्या वापरून झालेल्या गोष्टी आल्या—सेकंडहॅन्ड पुस्तकं, त्यातल्या रेघोट्यांसकट; सायकल, आणि नंतर नोकरीही मोठ्या भावाच्या ओळखीने. मोठ्या भावाने मोठा फ्लॅट घेतल्यावर त्याचा जुना फ्लॅट याने विकत घेतला.
लग्नानंतर सासू-सासरे मात्र यांच्याच घरी राहिले. त्यांची सेवा, आजारपण, सगळ्या जबाबदाऱ्या यांनीच सांभाळल्या. पण कौतुकाची वेळ आली की, त्यांच्या तोंडी नाव मात्र कायम थोरल्याचंच.....!