
05 June 2026
# 2055 : "पुण्यातल्या आप्पा बळवंत चौकाची कथा" ( प्रा.सौ. अनुराधा भडसावळे.)
Life of Stories
About
Send us Fan Mail
आज पुण्यातील आप्पा बळवंत चौकाला अनेकजण फक्त 'ABC चौक' म्हणून ओळखतात. पण त्या तीन अक्षरांमागे पानिपतच्या रणभूमीवर लिहिला गेलेला शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाचा एक जाज्वल्य इतिहास दडलेला आहे.
जिथे एका दिवसात महाराष्ट्राची तरुण पिढी रणांगणावर मावळली, तिथेच तलवारींसोबत निष्ठा, प्रेम आणि कर्तव्याचाही अद्भुत संग्राम घडला.
एका वीरपत्नीचे ज्वलंत शब्द, सरदार बळवंतराव मेहेंदळ्यांचा पराक्रम, सेनापती सदाशिवराव भाऊंची आपल्या माणसांवरील अपार माया आणि पुढे पुत्राने पूर्ण केलेला आई-वडिलांचा संकल्प...
इतिहासाच्या पानांवर विखुरलेल्या या ठिणग्या आजही मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवतात.
ही आहे पानिपतच्या रणभूमीवर जन्मलेल्या एका अमर गाथेची कहाणी...