# 2051 : हारा हाचि बू: वेटलॅासची जपानी पध्दत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
30 May 2026

# 2051 : हारा हाचि बू: वेटलॅासची जपानी पध्दत. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

जपानमधील लोक त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या कामातील चपळतेसाठी आणि वाढत्या वयातही असलेल्या उत्कृष्ट तंदुरुस्तीसाठी जगभर ओळखले जातात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या जीवनशैलीत आरोग्य आणि तंदुरुस्तीला दिले जाणारे महत्त्व. त्यांचे खाण्यापिण्याचे नियम खूप कडकअसतात. ते पौष्टिक पदार्थ, मोसमी भाज्या, ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेले सीफूड, कमी मसाले आणि कमी मीठ यांसारख्या गोष्टींची विशेष काळजी घेतात. पण त्यांच्या आरोग्याचे रहस्य फक्त आहारातच नसून जेवणाच्या पद्धतीत दडलंय.