
# 2045 : "Mr.Know all" Author / W. Somerset Maugh. by . (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Life of Stories
Send us Fan Mail
“मि. केलाडा, तुम्ही मोत्यांचे मोठे तज्ज्ञ आहात ना?” रॅमसे मिश्किलपणे म्हणाला. “मग सांगा बरं, माझ्या बायकोच्या गळ्यातली ही माळ किती किमतीची असेल?”
हा प्रश्न ऐकताच केलाडा यांच्या डोळ्यांत चमक आली. त्यांनी माळ हातात घेतली. मोती निरखले. ओठांवर आत्मविश्वासपूर्ण हसू उमटलं.
“ही माळ खरी आहे...” हे शब्द त्यांच्या ओठांपर्यंत आले.
पण त्याच क्षणी त्यांची नजर वर गेली... आणि ती मिसेस रॅमसे यांच्या डोळ्यांना भिडली.
क्षणभरापूर्वी आत्मविश्वासाने झळकणारे केलाडा अचानक थबकले.
त्या तरुणीच्या डोळ्यांत एक विचित्र भीती होती. जणू एखादं गुपित उघड होण्याच्या उंबरठ्यावर उभं होतं. आणि त्या भीतीमागे एक मूक विनवणी—
“कृपा करून... सत्य सांगू नका.”
केलाडांनी पुन्हा मोत्यांकडे पाहिलं. मग त्या डोळ्यांकडे.
आणि एका क्षणात त्यांना कळलं की हा प्रश्न मोत्यांचा नव्हता.
तो एका स्त्रीच्या आयुष्याचा होता...