# 2042 : "वेडात मराठे वीर दौडले सात" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
21 May 2026

# 2042 : "वेडात मराठे वीर दौडले सात" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

सरसेनापती प्रतापराव गुजरांचं  मन द्रवलं. त्यांनी बहलोलखानाला जिवंत सोडलं. बातमी रायगडावर पोहोचली. शिवाजी महाराज दूरदृष्टीचे होते. राजे  भयंकर संतापले. महाराजांनी प्रतापरावांना खलिता पाठवून जाब विचारला,  त्या पत्रातले शब्द..तलवारीपेक्षाही तीक्ष्ण होते.

“तह काय निमित्त केलात? बहलोलखाना सारख्या  शरण आलेल्या शत्रूला असं सहज सोडलंत? खानाचा पुरता बीमोड केल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका.” 

हे वाक्य त्यांच्या जिव्हारी लागलं.....

साल सोळाशे चौऱ्याहत्तर. कोल्हापूरजवळचं नेसरी नावाचं छोटंसं खेडं. आकाशात धुळीचे लोट उठलेत . समोर बहलोलखानाची  १५ हजारां ची फौज.  आणि या बाजूने  त्यांच्याशी सामना करायला ... फक्त सात.... फक्त सात घोडेस्वार वेगाने दौडत निघाले ....