# 2028 : शस्त्रपुजेची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
29 April 2026

# 2028 : शस्त्रपुजेची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send us Fan Mail

पांडवांनी द्रौपदीच्या सोबतीने वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत १२ वर्षे वनवास पूर्ण केल्यानंतर त्यांना अज्ञातवासात जायचे होते. अज्ञातवास म्हणजे ते कुठे आहेत हे कोणालाही माहित न होणे. द्युताच्या नियम अटीनुसार त्यांना अज्ञातवासात कोणी ओळखले तर त्यांना परत वनवासात जावे लागणार होते. 
यासाठी पांडवांनी अज्ञातवासासाठी विराट राजाचे मत्स्य राज्य निवडले. त्यांनी आपला वेष बदलला आणि विराट राजाच्या सेवेत वेगवेगळ्या नावांनी रुजू झाले. सर्वांनी आपापल्या स्वभाव आणि गुणधर्माला अनुसरुन रूप घेतले.