# 1988 : स्मशानातील बाप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
10 March 2026

# 1988 : स्मशानातील बाप. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Life of Stories

About

Send a text

पुण्याच्या 'वैकुंठ स्मशानभूमीत' गेल्या तीस वर्षांपासून 'महादेव' हे मृतदेह जाळण्याचे काम करायचे. अंगावर एक मळकट धोतर, राखेने माखलेले शरीर आणि कपड्यांना येणारा जळक्या लाकडांचा व मांसाचा उग्र वास... हीच महादेव यांची ओळख होती. त्यांच्या या कामामुळे त्यांना समाजात कोणीही जवळ करत नसे.