
# 1984 : "बैलगाडीचा पायलट," लेखक : विशाल गरड. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
Life of Stories
Send a text
पप्याचा चिन्मय हा बालमित्र. सध्या बेंगलोरला पायलट म्हणून काम करत असतो. गावाकडे जत्रेसाठी वर्षातून एकदा येतो. “ “अरे विमान चालवणं म्हणजे काय तुला बैलगाडी चालवणे इतका सोपं वाटतं काय?” चिन्मयने विचारले.
दोघे पप्या ची बैलगाडी घेऊन रानात निघाले. पण चिन्मयला काही बैलगाडी आणि बैल सांभाळता येईना. त्यांने बैलगाडी डायरेक्ट ओढ्यामध्येच लँड केली.
“अरे निर्जीव मशिनी चालवण्या परीस हे जिवंत चित्रा व सांभाळणं लय अवघड असतं बाबा! जीवाला जीव जोडावा लागतंय तवा कुठे जनावर ऐकतय” म्हणत पप्प्याने बैलांच्या सोन्या आणि गुण्याच्या शेपट्या विरघळल्या आणि गाडी झपाट्याने रानात पोहोचवली.
“ मित्रा खरंच हृदय आणि मन असलेल्या बैलांचे ड्रायव्हिंग करणं अवघड असते बरं आम्ही विमानाने माणसं वाहून नेतो पण तुम्ही शेतात बैल चालवणारे शेतकरी तुमच्या बैलगाडीने देशाची अर्थव्यवस्था ओढत असता” चिन्मय म्हणाला.