
03 February 2026
# 1960: हरकचंद सावला: कॅन्सर पेशंट्सचा सेवाव्रती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
Life of Stories
About
Send a text
आपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे ३० पेक्षा जास्त वर्षे अविरत सुरु राहील याची त्याला स्वतःलाही कल्पना नव्हती. कॅन्सरग्रस्त रुग्णांना अन त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजन द्यायचा त्याचा हा उपक्रम परिसरातील असंख्य लोकांना आवडला. सुरुवातीला पाच पन्नास लोकांना भोजन देता देता शंभर, दोनशे, तीनशे अशी संख्या वाढू लागली तसे असंख्य हात त्यांच्या सोबतीला येऊ लागले. बघता बघता एकामागून एक वर्ष उलटत गेली. कधी हिवाळा,कधी उन्हाळा तर कधी मुंबईतला भयंकर पावसाळाही त्यांच्या यज्ञात खंड पाडू शकला नाही.