
About
Send us a text
सकाळपासून देसाई सर आरशासमोर उभे राहून तयारी करत होते. त्यांनी आपला जुना पण कडक इस्त्री केलेला पांढरा शुभ्र शर्ट आणि खाकी पॅन्ट घातली होती. मनात एक वेगळीच हुरहुर होती. "आज नक्कीच शाळेत मोठा कार्यक्रम असेल. सगळी जुनी पोरं येतील, भाषणांवर भाषणं होतील, गळ्यात हारांचे ओझे असेल..." या विचारानेच त्यांचे डोळे पाणावले होते.