
About
Send us a text
एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले "तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?" सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले. यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंत सर्वांचा समावेश होता.
"ऐसा सद्गुरु पूर्णपणी" हा पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही, तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल?" सारे शिष्य गडबडले. अगदी अकराशे पारायणे झालेला सुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला. तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले "स्वामीजी,ऐसा सद्गुरु पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."